फार्मसिस्ट हा रुग्ण व डॉक्टरमधील दुवा

By Admin | Updated: September 27, 2016 00:37 IST2016-09-27T00:37:06+5:302016-09-27T00:37:06+5:30

मानवाचे सुदृढ आरोग्य हीच सर्वोत्तम देणगी आहे. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करीत असतो.

The pharmacist is a link between the patient and the doctor | फार्मसिस्ट हा रुग्ण व डॉक्टरमधील दुवा

फार्मसिस्ट हा रुग्ण व डॉक्टरमधील दुवा

संयुक्तपणे काढली रॅली : भंडाऱ्यात वर्ल्ड फार्मसिस्ट डे उत्साहात
भंडारा : मानवाचे सुदृढ आरोग्य हीच सर्वोत्तम देणगी आहे. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करीत असतो. तरीही आजाराचा विळखा होतच असतो. अशावेळी औषधांचा पुरवठा व उपलब्धतता महत्वाची बाब असते. फार्मसिस्ट हा रुग्ण व डॉक्टर यांच्यामधील महत्वपूर्ण दुवा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी केले.
येथील हेमंत सेलीब्रेशन सभागृहात आयोजित वर्ल्ड फार्मसिस्ट डे निमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. तत्पूर्वी संपूर्ण शहरातून जनचेतना रॅली काढण्यात आली. सदर कार्यक्रम भंडारा जिल्हा औषधी विक्रेता संघ, महाराष्ट्र फार्मसी आॅफीसर असोसिएशन भंडारा, अनुराग कॉलेज आॅफ फार्मसी वरठी व बाजीराव करंजेकर कॉलेज आॅफ फार्मसिस्ट साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. ‘नो युवर फार्मसिस्ट’ ही संकल्पना सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याच्या मुख्य उद्देशाने सदर कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात रॅलीने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.चौधरी यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. श्री गणेश शाळेतून सुरु झालेली रॅली राजीव गांधी चौक ते गांधी चौक व परत राजीव गांधी चौकात परत आली. या नंतर सभागृहात कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी मंचकावर नागपूर विद्यापीठाचे प्र कुलगुरु डॉ.पी.जी. येवले, उपसंचालक डॉ.संजय जैस्वाल, एम.जी. केकतपुरे, सहाय्यक आयुक्त दा.रा. गहाणे, डॉ.मिलिंद उमेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवी धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत उईके, हरिश गणेशानी, शशीभूषण नागपुरे, भंडारा जिल्हा औषधी वितरीत संघाचे अध्यक्ष संजय खत्री, प्रशांत रामटेके, मनिष गोटमारे, केशर धारगावे, रामदास कुरंजेकर, प्राचार्य दामोदर गौपाले, संजय निंबार्ते, नितीन शेंदरे, प्राचार्य सचिन लोहे, शिवशंकर बावनकुळे, फार्मसी अधिकारी कळंबे, बावनकर आदी उपस्थित होते. अतिथींनी फार्मसिस्ट यांचे समाजातील महत्व विशद केले. यावेळी गुणवंत फार्मसिस्ट अशा ६० जणांचा सत्कार करण्यात आला. समाजामध्ये औषधांचा होत असलेला दुरुपयोग टाळण्यासाठी औषधी विक्रेत्यांना प्रोत्साहीत करून समाजाप्रती त्यांचे कर्तव्य सांगण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य औषधी विक्रेता संघ मुंबई तर्फे अपग्रेडेशन कीटचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता फार्मसिस्ट प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली. आभार प्राचार्य लोहे यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: The pharmacist is a link between the patient and the doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.