लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : सर्वसामान्यांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून पेट्रोल व डिझेलचे दर ३०-४० रुपयांपर्यंत आणण्याचे, गॅस ४०० रुपयात देण्याचे गाजर दाखविणाऱ्या केंद्र व राज्य शासनाने मागील एका वर्षात पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात सातत्याने भाववाढ केलेली आहे, दररोज पेट्रोल, डिझेलच्या किंमती गगनभरारी घेत आहेत.राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील गरीब शेतकरी, शेतमजूर, व्यापारी व सर्वसामान्यांमध्ये रोजच्या दरवाढीमुळे केंद्र व राज्य शासनाबाबत असंतोष निर्माण झालेला आहे. तसेच संपूर्ण देशात पेट्रोल व डिझेलचे सर्वाधिक दर महाराष्ट्रात लागू आहेत. पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे केवळ महाराष्ट्रतीलच नव्हे तर देशातील सर्वसामान्यांची सर्रास लूट सुरू असल्याचे दिसून येत आहे. पेट्रोल, डिझेल व गॅसवर केलेली दरवाढ केंद्र शासनाने त्वरित मागे घेऊन तसेच राज्य शासनाने व्हॅट मध्ये सूट देऊन पेट्रोल व डिझेलचे दर कमी करून वाढलेली महागाई आटोक्यात आणता येऊ शकते.करिता केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेल व गॅसवर केलेली दरवाढ तात्काळ कमी करावी तसेच राज्य शासनाने व्हॅटमध्ये सूट देऊन पेट्रोल, डिझेल, व गॅसचे दर लवकरात लवकर कमी करावे अन्यथा लाखनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे जनआंदोलनाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात तीव्र जनआंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.या आशयाचे निवेदन प्रधानमंत्री, भारत सरकार, मुख्यमंत्री, महाराष्ट्र यांना मधुकर कुकडे खासदार यांचे नेतृत्वात तहसीलदार लाखनी यांचेमार्फत देण्यात आले.याप्रसंगी लाखनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पाटीर्चे तालुकाध्यक्ष डॉ. विकास गभने, शहर अध्यक्ष धनू व्यास, नागेश पाटील वाघाये, उर्मिला आगाशे, मोरेश्वर दोनोडे, प्रवीण बोरकर, रवींद्र हलमारे, कैलास वरकडे, निलेश गाढवे, शशिकांत भोयर, रवी व्यास, सागर बोरसरे, अरमान धरमसारे, रामा गिहेर्पुंजे, राजेंद्र वालोदे, विवेक गिहेर्पुंजे, नागशेष शेंडे, रोहित साखरे, नाना सिंगनजुडे, हितेश झिंगरे, सुरेश बोपचे, दिनेश निर्वाण, सुनंदा धनजोडे, आयशा शेख, माधव डोरले, दीपक वाघाये, गुरुदेव भोयर, अमरदीप बोदेले, सिद्धार्थ गायधनी, अमोल घुले, नाजूक गायधनी, विजय चाचेरे, आकाश गहरवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:41 IST
सर्वसामान्यांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून पेट्रोल व डिझेलचे दर ३०-४० रुपयांपर्यंत आणण्याचे, गॅस ४०० रुपयात देण्याचे गाजर दाखविणाऱ्या केंद्र व राज्य शासनाने मागील एका वर्षात पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात सातत्याने भाववाढ केलेली आहे, दररोज पेट्रोल, डिझेलच्या किंमती गगनभरारी घेत आहेत.
पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीचा निषेध
ठळक मुद्देलाखनी राष्ट्रवादी काँग्रेस : व्हॅटमध्ये सुट दिल्यास दरवाढ नियंत्रणात