मिरचीच्या सातऱ्यांनी मिळाला रोजगार
By Admin | Updated: March 12, 2015 00:21 IST2015-03-12T00:21:44+5:302015-03-12T00:21:44+5:30
शहरामध्ये मिरचीचे दांड्या कापण्याचे सातरे सुरु झाल्यामुळे मोठ्या संख्येतील बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आहे. हे सातरे अजून तीन ते चार महिने सुरु राहणार आहे.

मिरचीच्या सातऱ्यांनी मिळाला रोजगार
लक्ष्मीकांत तागडे पवनी
शहरामध्ये मिरचीचे दांड्या कापण्याचे सातरे सुरु झाल्यामुळे मोठ्या संख्येतील बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आहे. हे सातरे अजून तीन ते चार महिने सुरु राहणार आहे.
भंडारा जिल्ह्यातील अनेक गावात मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. यासोबतच लगतच्या नागपूर जिल्ह्यामध्येही मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन होते. मिरची निघणे आता सुरु झाले आहे. त्यामुळे देशातून दूरवरून मिरचीचे व्यापारी भिवापूर, कुही, मांढळ आदी मिरचीच्या बाजारपेठेत पोहचले आहेत.हे व्यापारी अर्धी पिकलेल्या लाल मिरच्या (डोडा) खरेदी करून विविध केंद्रावरील सातऱ्यावर वाळण्याकरिता घालतात. येथेच मिरचीच्या दांड्या कापण्याचे काम करण्यात येते. अगोदर तीन वर्षापूर्वी पवनी तालुक्यातील मजूर दांड्या कापण्याकरिता भिवापूर येथे जात होते. पण तीन वर्षापासून पवनी तालुक् यातच सातरे सुरु झाल्यामुळे तालुक्यातील मोठ्या संख्येतील बेरोजगारांना काम मिळत आहे. दरवर्षी सातऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. ग्रामीण भागात जवळपास आठ ते दहा सातरे सुरु आहेत. मागील वर्षीपासून पवनी शहराच्या आजूबाजूला सातरे सुरु झाले. त्यामुळे शहरातील बेरोजगारांनाही काम मिळू लागले आहे. यावर्षी शहराच्या आजूबाजूला खापरी रस्त्यावर कन्हाळगाव रस्त्यावर, चिचखेडा रस्त्यावर, चंद्रमणी विहाराजवळ, भंडारा रस्त्यावर असे पाच सातरे सुरु झाले आहेत. त्यामुळे जवळपास ३०० बेरोजगारांना काम मिळाले आहे. या सातऱ्यावर पुरुष, महिला, युवक, युवती मोठ्या संख्येने सातऱ्यावर काम करतात.