लोकप्रतिनिधींनी वाचला समस्यांचा पाढा

By Admin | Updated: September 11, 2016 00:26 IST2016-09-11T00:26:16+5:302016-09-11T00:26:16+5:30

शिक्षण, वीज, वनविभाग व बांधकाम विभागाविरोधात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तुमसर पंचायत समितीच्या आमसभेत समस्यांचा पाढा वाचला.

People's representatives have read the problem | लोकप्रतिनिधींनी वाचला समस्यांचा पाढा

लोकप्रतिनिधींनी वाचला समस्यांचा पाढा

तुमसर पं.स.ची आमसभा : चरण वाघमारे यांनी केली अधिकाऱ्यांची कानउघाडणी 
तुमसर : शिक्षण, वीज, वनविभाग व बांधकाम विभागाविरोधात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तुमसर पंचायत समितीच्या आमसभेत समस्यांचा पाढा वाचला. आमदार चरण वाघमारे यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी राजशिष्टाचार मोडल्याबद्दल सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे निर्देश मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना दिले. वीज वितरण कंपनीत स्थायी कर्मचाऱ्यांनी भाडेतत्वावर स्वतंत्र नियुक्ती केल्याबद्दल कारवाईचे निर्देश दिले.
तुमसर पंचायत समितीच्या आमसभेच्या अध्यक्षस्थानी आमदार चरण वाघमारे होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अहिरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, सभापती शुभांगी राहांगडाले, तुमसरच्या सभापती कविता बनकर, उपसभापती शेखर कोतपल्लीवार, गटनेते हिरालाल नागपूरे, खंडविकास अधिकारी मनोज हिरुडकर उपस्थित होते.
या आमसभेत राजापूरसह अन्य गावात शिक्षकांची पदे रिक्त आहेत. गणपती महोत्सव स्पर्धेत एकाही गावाने सहभाग नोंदविला नाही, असा प्रश्न सरपंचानी उपस्थित केला. यावर गटशिक्षणाधिकारी उत्तर देण्यासाठी असमर्थ ठरले. काही लोकप्रतिनिधींनी शिक्षण विभागाविरुद्ध प्रश्न मांडले, एकाही प्रश्नाचे ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. त्यामुळे आ. वाघमारे यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावून राजशिष्टाचार पाळत नसल्याबद्दल गटशिक्षणाधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे निर्देश दिले. वर्ग ५ व ८ चे वर्ग जिल्हा परिषद शाळेत सुरु राहतील, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी दिली. शाळेच्या वर्गखोल्या जीर्ण, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत क्रीडांगण सपाटीकरण करण्यासंदर्भात माहिती दिली.
मंगरली येथील वाघाने ठार मारहाण प्रकरणी १० हजाराचा निधी मंजूर करण्यात आला. वनपरिक्षेत्राधिकारी (लेंडेझरी) एस.यु. मडावी यांनी चोख कर्तव्य पार पाडावे अशी सूचना केली. शाळेकडून वीज वितरण कंपनी व्यावसायीक दराने वीज बिल वसूल करते असा प्रश्न सितेपारचे सरपंच गजानन लांजेवार यांनी उपस्थित केला. तो घरगुती दराने वीज बिल देण्यात यावी अशी विनंती लांजेवार यांनी केली.
आठ दिवसात मुख्याध्यापकांच्या रिक्त जागा तथा विज्ञान व गणित शिक्षकांच्या नियुक्ती करण्याचे निर्देश आ. वाघमारे यांनी दिले. मागील काही वर्षापासून सेवानिवृत्त शिक्षकांचे वरिष्ठ श्रेणीचे प्रकरण भंडारा येथे प्रलंबित आहे. ते निकाली काढण्याचा ठराव आमसभेत घेण्याचा सुचना दिल्या. आमसभेला जि.प. सदस्य संदीप टाले, गीता माटे, संगीता मुंगुसमारे, संगीता सोनवाने, प्रेरणा तुरकर, रेखा ठाकरे, जितेंद्र सरीयाम, शिशुपाल गौपाले, बाळकृष्ण गाढवे, अशोक बन्सोड, अरविंद राउत, गुरुदेव भोंडे, मुन्ना पुंडे, रोशना नारनवरे, मंगला कनपटे, मालिनी वहीले, रेखा धुर्वे, साधना चौधरी, सीमा गौपाले, अरविंद राऊत, रिता मसरके, वसंत बिटलाये, रेणु मासुलकर सह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य , पं.स. चे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: People's representatives have read the problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.