लोकसहभाग हाच जलयुक्त शिवारचा आत्मा

By Admin | Updated: March 5, 2016 00:35 IST2016-03-05T00:35:10+5:302016-03-05T00:35:10+5:30

जलयुक्त शिवार ही केवळ शासकीय योजना म्हणून याकडे पाहू नये. ही भविष्यकाळातील पाणी टंचाईवर मात करणासाठीची लोकचळवळ आहे.

People's participation is the soul of the submerged shire | लोकसहभाग हाच जलयुक्त शिवारचा आत्मा

लोकसहभाग हाच जलयुक्त शिवारचा आत्मा

जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : जलयुक्त शिवार जिल्हास्तरीय कार्यशाळा
भंडारा : जलयुक्त शिवार ही केवळ शासकीय योजना म्हणून याकडे पाहू नये. ही भविष्यकाळातील पाणी टंचाईवर मात करणासाठीची लोकचळवळ आहे. या योजनेत  लोकांचा सहभाग सर्वात महत्त्वाचा असून यावर्षी निवड झालेल्या गावातील प्रत्येक व्यक्तीला पुढच्या पिढीसाठी पाण्याची तरतूद करुन ठेवण्याकरिता मिळालेली ही शेवटची संधी आहे, असे समजून यामध्ये सक्रीय सहभाग घ्यावा. अन्यथा आपली पुढची पिढ़ी आपल्याला माफ करणार नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.
जलयुक्त शिवार अभियान २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील ६९ गावांची निवड करण्यात आली. या गावात जलयुक्त योजनेचे योग्य नियोजन, अंमलबजावणी आणि लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, पुणे येथील मनरेगा उपायुक्त बाळासाहेब शिंदे, अकोला येथील जल व मृद संधारण विभागाचे डॉ. एस.एम. टाले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जे. एस. भोर, पवनीच्या मुख्याधिकारी पवनीत कौर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.नलिनी भोयर उपस्थित होते. 
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात आपल्या आधीच जलयुक्त शिवारचे उत्कृष्ट काम केले आहे. त्यांनी अनेक मामा तलावांच्या निर्मितीतून गावातील पाणी गावातच साठवले. तेव्हा कोणतीही सरकारी योजना नव्हती. हे आपले पाणी आहे हे समजून घेऊन त्यांनी पुढच्या पिढीसाठी काम केले. शेकडो वषार्पुर्वी करुन ठेवलेल्या या साठवण तलावांची क्षमता पुनर्जिवित करण्यासाठी मात्र आता लोकांचा सहभाग मिळत नाही, ही अतिशय खेदजनक बाब आहे.  आपण आता काम केले नाही तर जी परिस्थिती मराठवाड्याची आहे तशी परिस्थिती आपल्या जिल्ह्यात निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.  भविष्यातील धोका समजून घेऊन गावातील लोकांनी योग्य नियोजना सोबतच प्रत्यक्ष लोकसहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बाळासाहेब शिंदे म्हणाले, शासनाला जलयुक्त शिवार अभियान राबविण्याची गरज का पडली याची पार्श्वभूमी समजून सांगितली. जलयुक्तमध्ये पाणलोटच्या कामांना प्राधान्य देताना माथा ते पायथा या तत्वाप्रमाणे काम  करण्याची गरज आहे. त्याचबरोबर अस्तित्वातील साठवण  संरचनाचे पुनर्जीवन व दुरुस्तीची कामे पहिल्यांदा हाती घेतली पाहिजे. त्याचबरोबर विहिरींचे पुनर्भरण, स्थानिक प्रजातीच्या झाडांची लागवड आदी कामे घ्यावी, असे सांगितले. मृद व जलसंधारण विभागाचे डॉ.टाले यांनी शेतात पडणाऱ्या पाण्याचे नियोजन कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर छतावरील वाहून जाणाऱ्या पाण्याचे पुनर्भरण केल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. पूर्वीच्या दुष्काळात आणि आताच्या दुष्काळात खुप तफावत आहे. तेव्हा नदी नाल्यांमध्ये पाणी होते आणि अन्नधान्याची टंचाई होती. आता मात्र गावातील नदी, नाले, विहिरी कोरड्या आहेत. त्यामुळे या दुष्काळाची भीषणता अधिक आहे. यासाठी जागच्या जागी पाणी जिरवणे यावर भर दिला पाहिजे. शेतात कमी पाण्यात अधिक पिक घेणे, पिक पद्धतीत बदल करणे आजच्या काळाची गरज आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी संरक्षित सिंचनासाठी शेततळे घेतले पाहिजे. यामुळे विहिरीचे पुनर्भरण आणि जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही मार्गदर्शन केले. प्रस्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. नलिनी भोयर यांनी केले. संचालन व आभार सोनवने यांनी केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: People's participation is the soul of the submerged shire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.