गावच्या शिलेदारांचा लोकमततर्फे गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 05:00 AM2019-11-26T05:00:00+5:302019-11-26T05:01:16+5:30

सोहळ्याची सुरुवात ज्येष्ठ स्वातंत्र सेनानी तथा लोकमतचे संस्थापकीय संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजींच्या प्रतिमेला अतिथींच्या हस्ते माल्यार्पण व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर श्रीगणेश वंदना व अतिथींचे तुळशीचे रोपटे देवून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित पाहूण्यांनी सरपंचांना मार्गदर्शन केले.

People of village village boast of public opinion | गावच्या शिलेदारांचा लोकमततर्फे गौरव

गावच्या शिलेदारांचा लोकमततर्फे गौरव

Next
ठळक मुद्देलोकमत सरपंच अवॉर्ड : मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे भंडारा येथे थाटात वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गावातील प्रथम नागरिक म्हणून ओळख व गाव विकासाचा केंद्र बिंदू असलेल्या भंडारा जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गाव शिलेदारांचा अर्थातच सरपंचांचा लोकमततर्फे सोमवारी गौरव करण्यात आला. यात ‘सरपंच ऑफ द इयर’ या पुरस्कारासह १३ सरपंचांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
बीकेटी टायर प्रस्तुत लोकमत सरपंच अवॉर्ड वितरण सोहळा येथील साखरकर सभागृहात थाटात पार पडला. अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रेम वनवे, भंडारा पालिका उपाध्यक्ष आशिष गोंडाणे, रापमचे विभागीय नियंत्रक विनोद भालेराव, बीकेटी टायर्सचे मुख्य वितरक दीपक बनकोठी, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अश्विनी भोंडेकर, जिल्हा परिषद सदस्य निळकंठ कायते, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, नगरसेवक संजय कुंभलकर, भंडाराचे उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, बीटीबीचे अध्यक्ष बंडू बारापात्रे, लोकमत प्रादेशिक विभाग प्रमुख गजानन चोपडे, जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर मुंदे, जिल्हा व्यवस्थापक मोहन धवड आदी मान्यवर उपस्थित होते.
सोहळ्याची सुरुवात ज्येष्ठ स्वातंत्र सेनानी तथा लोकमतचे संस्थापकीय संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजींच्या प्रतिमेला अतिथींच्या हस्ते माल्यार्पण व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर श्रीगणेश वंदना व अतिथींचे तुळशीचे रोपटे देवून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित पाहूण्यांनी सरपंचांना मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. अश्विनी भोंडेकर म्हणाल्या, गावात विकास कामांना मूर्त रुप देणाºया सरपंचांचा गौरव होणे ही अप्रतिम व अतुलनीय अशी संकल्पना आहे. ज्याप्रमाणे मानवी शरीर सुदृढ राहण्यासाठी मुलभूत बाबी आवश्यक आहेत. तशाच गावाच्या विकासासाठी सरपंचांची भूमिका महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
भंडारा पालिकेचे उपाध्यक्ष आशिष गोंडाणे म्हणाले, थेट जनतेमधून निवडूण आलेल्या सरपंचांना भरीव काम व समाजाप्रती योगदान करण्यासाठी बराच कालावधी मिळतो. यात नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या मूलभुत गरजा पुर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. याच कामामुळे भविष्यात जवाबदारी वाढत असते.
नगरसेवक संजय कुंभलकर म्हणाले, योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सरपंचांच्या खांद्यावर आहे. शुध्द पाणी, रस्ते, वीज पुरवठा यासह अन्य गरजांची व योजनांच्या माध्यमातून सुविधा मिळणे गरजेचे आहे. यात सरपंचानी लक्ष घालून त्या पूर्ण कराव्यात असेही कुंभलकर म्हणाले.
उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड म्हणाले, गाव पातळीवर सरपंचांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. आजघडीला शेतीचे गट तयार करुन त्या माध्यमातून आर्थिक उलाढाल कशी वाढविता येईल, यावर भर देण्यात येत आहे. यासाठी सर्व स्तरातून सहकार्य अपेक्षीत आहे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
सोहळ्याचे संचालन इव्हेंट एक्झुक्युटीव्ह पुनम तिवारी महात्मे यांनी तर प्रास्ताविक लोकमत प्रादेशिक विभाग प्रमुख गजानन चोपडे यांनी केले. आभार प्रतिनिधी इंद्रपाल कटकवार यांनी मानले.
सोहळ्यासाठी लोकमत सखी मंचच्या जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार, प्रिती मुळेवार, अर्चना भुरे, मनिषा रक्षीये, श्रध्दा डोंगरे, संगीता गोमासे, अश्विन पतरंगे, ललीत घाटबांधे, देवानंद नंदेश्वर, संतोष जाधवर, विनोद भगत, योगेश पडोळे, मंगेश चरडे, रोशन वंजारी आदींनी सहकार्य केले.

सुरेखा खराबे ठरल्या ‘सरपंच ऑफ द इयर’
मोहाडी तालुक्यातील पालटोंगरी येथील सरपंच सुरेखा प्रकाश खराबे यांनी गाव विकासासाठी केलेल्या भरीव योगदानासाठी त्यांची ‘सरपंच आॅफ द इयर’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. सोमवारी पार पडलेल्या समारंभात सुरेखा खराबे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘सरपंच आॅफ द इयर’ हा पुरस्कार देवून गौरविण्यात आला. शुद्ध पाणी, रस्ते निर्मिती, दळणवळणाच्या सुविधा, वृक्ष लागवड व संवर्धन यासह अन्य क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे.

सोसायटी अध्यक्षांचाही व्हावा सत्कार
केंद्र शासनाने सेवाभावी संस्था म्हणून सेवा सहकारी संस्थांची (सोसायटी) गणना केली आहे. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित आहे. धान खरेदीपासून ते पुढील हंगामापर्यंत सेवा सहकारी संस्थाची भुमिका अत्यंत महत्वाची असते. या सोसायटींच्या माध्यमातून जिल्हाभरात धानाची खरेदीही केली जाते. अशा स्थितीत या सोसायट्यांच्या पदाधिकाºयांचा शेतकºयांशी अत्यंत जवळचा संबंध निर्माण होत असतो. शेतकºयांना येणाºया अडीअडचणी सोडविण्याचे कार्य सोसायटींचे अध्यक्ष व पदाधिकारी करीत असतात. अशा स्थितीत खºया अर्थाने विविध सेवा सहकारी सोसायटींच्या अध्यक्षांचाही अशा पध्दतीने सत्कार होणे काळाची गरज असल्याचे मत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी व्यक्त केले.
गावपातळीवर गावातील समस्या सोडविण्याचे कार्य सरपंच करीत असतात. मात्र कृषी क्षेत्राशी निगडीत असलेल्या समस्या सेवा सहकारी संस्थांच्या पदाधिकाºयांमार्फत सोडविले जातात. आजघडीला धान खरेदी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. अशा स्थितीत शेतकरी घटकाची व्यथा सोडविण्यावर सोसायटी अध्यक्षांचा मोलाचा वाटा असतो. याशिवाय ग्रामस्थांना शुध्द पाणी, रस्ते, वीज, यासारख्या मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी सरपंचांच्या खाद्यावर आहे. निधीचा उपयोग योग्य कामासाठी झाला पाहिजे. याची सहानिशा सरपंचांनी स्वत: केली पाहिजे. कुणाचाही मनमानी कारभार खपवून न घेता लोकशाही पध्दतीने गावाचा विकास घडविण्यावर सरपंचाची भुमिका लाख मोलाची आहे, असेही फुंडे म्हणाले.

Web Title: People of village village boast of public opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.