श्रमदानातून साकारला ग्रामस्थांनी पांदण रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2015 00:23 IST2015-08-26T00:23:43+5:302015-08-26T00:23:43+5:30

तालुक्यातील विहीरगाव बुराड्या येथील नागरिकांनी लोकसहभागातून दळणवळणासाठी पांदन रस्ता तयार केला.

The people of Padanana started from Pandan road | श्रमदानातून साकारला ग्रामस्थांनी पांदण रस्ता

श्रमदानातून साकारला ग्रामस्थांनी पांदण रस्ता

विहीरगाव येथील प्रकार : अन्य गावांसमोर ठेवला आदर्श
साकोली : तालुक्यातील विहीरगाव बुराड्या येथील नागरिकांनी लोकसहभागातून दळणवळणासाठी पांदन रस्ता तयार केला. यात लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून कोणतीही मदत घेण्यात आली नाही. गावकऱ्यांच्या या अभिनव उपक्रमाचा सर्वस्तरातून कौतूक करण्यात येत आहे.
साकोली तालुक्यातील सानगडीपासून अवघ्या तीन कि.मी. अंतरावर असलेल्या विहिरगाव (बु.) हे छोटेसे गाव. चुलबंद नदीकाठावर वसलेल्या व धार्मिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेल्या येथील लोकांचे मुख्य व्यवसाय म्हणजे पारंपारिक शेती व शेतीवरील मजुरी हे आहे. मात्र राजकीय अनास्थेपायी या गावाकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष केले आहे. या गावालगत चुलबंद नदी असल्याने रेतीमाफियांनी आपले बस्तान मांडले. त्यामुळे सानगडी ते विहिरगाव या ३ कि.मी. डांबरी रस्त्यावर दिवसरात्र रेती चोरी ट्रॅक्टरच्या वाहतुकीचा जड वाहनांचा मारा पडत असल्याने या मजबूत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. आधीच अरुंद रस्ता त्यावर खड्यांचे साम्राज्य अत्यंत जीवघेणे खड्डे असतानाही दळणवळणाची जीवदायी ठरणाऱ्या या रस्त्याकडे कुणाचेही लक्ष नाही.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेकडो एकर शेती काही वर्षापूर्वीया पांदन रस्त्याचे काम झाले होते. परंतु त्यानंतर दुर्लक्ष झाल्याने या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे झाडे झुडपे वाढले. शेतकऱ्यांना शेतात जाताना जीव मुठीत घेऊन कसरत करावी लागत होती. मागणी करून अपेक्षा पूर्ण होत नसल्याने शेवटी शेतकऱ्यांनी निर्णय केला की आपणच श्रमदानातून पांदन रस्ता दुरुस्त करायचा. यासाठी विकास बनकर, वासुदेव बनकर, पुरुषोत्तम बनकर, बाळकृष्ण बनकर, अभय वाचलकर, गोपाल बनकर, विलास इरामे, सेवक इरले, कैलाश इरले, बंडू इरले, राजेश इरले, टेकराम उपरीकर, नलू मानकर, गीता नेवारे, सुशीला नेवारे, सुखदेव नेवारे, सुरेश उपरीकर, विनोद सुरजबंशी, दीपक उपरीकर, गणेश नगरकर, दुधराम वडीकार, केशर गायधने यांनी श्रमदान करून पांदन रस्ता साफ केला.
हंसराज नगरकर यांचे २ आणि मुरलीधर बनकर यांचा १ अशा ३ ट्रॅक्टरने ९० ट्रीप गिट्टी, रेती, माती व मुरुम आणून रस्ता मजबूत केला. या रस्ता शासनाने जर तयार केला असता तर जवळपास ७ ते १० लक्ष रुपये खर्च झाला असता. परंतु गावकऱ्यांनी कुठलीही अपेक्षा न करता सदर पांदन रस्ता मजबूत केला. त्यामुळे या रस्त्यावरील शेतकरी आता रात्रीही बेधडक शेताची पाहणी करण्यास जातात. या पांदन रस्त्यासाठी जिल्हा परिषद सदस्य रेखा वासनिक, सरपंच हरिभाऊ बनकर, चुन्नीलाल वासनिक यांचे मार्गदर्शन लाभले. मात्र विहिरगाववासीयांचा हा प्रयत्न आदर्श ठरला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The people of Padanana started from Pandan road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.