शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

‘त्या’ कुटुंबीयांना मिळणार पेन्शनचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 06:00 IST

भंडारा जिल्ह्यातील कृषी विभाग, शिक्षण विभाग, महसूल, वनविभागासह इतर विभागातील २००५ नंतर रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास ३५ च्या घरात आहे. या कुटुंबियांना असंख्य अडचणी येत असून कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला होता.

ठळक मुद्देशासन अध्यादेश काढणार : २००५ नंतरच्या चार हजार लाभार्थ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यात विविध मागण्यांसाठी राज्य सरकार विरोधात आंदोलने, संप पुकारल्यानंतर शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळे २००५ नंतरच्या मृत शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा महत्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. २००५ नंतर शासनसेवेत दाखल झालेल्या राज्यातील सुमारे चार हजार कुटुंबियांना संकटांचा सामना करावा लागत होता. अखेर त्यांना न्याय मिळणार आहे.भंडारा जिल्ह्यातील कृषी विभाग, शिक्षण विभाग, महसूल, वनविभागासह इतर विभागातील २००५ नंतर रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास ३५ च्या घरात आहे. या कुटुंबियांना असंख्य अडचणी येत असून कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला होता. परंतु शासनाने शासकीय, निमशासकीय शिक्षण शिक्षकेत्तर समिती, जुनी पेंशन हक्क संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत वित्त राज्य मंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत २००५ नंतर शासकीय सेवेत रूजू झालेल्या कर्मचाºयांच्या मृत कुटुंबियांना पेंशन लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. लवकरच यासंबधी अध्यादेश काढणार असल्याचे जुनी पेंशन हक्क संघटनेचे अध्यक्ष संतोष मडावी, महेश ईखारी यांनी सांगितले.१ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत रूजू झालेल्या शासकीय कर्मचाºयांसाठी शासनाने १९८२-८४ ची जुनी पेंशन योजना बंद करून नवीन अंशदायी पेंशन योजना सुरू केली. यामध्ये कुटुंबाच्या वारसाला कोणत्याही पेंशन योजनेचा तसेच अनुकंपा तत्वावर नोकरी, अथवा ग्रॅज्युईटीचा लाभ मिळत नव्हता. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची हलाखीची परिस्थिती निर्माण झाली असून अनेक कुटुंबे पेंशनसाठी न्यायाच्या प्रतिक्षेत होती. त्या सर्वं कुटुंबांना शासनाने मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना पेंशनचा निर्णय घेतल्याने आनंद द्विगुणीत झाला आहे. नेतृत्व समन्वयक समितीचे पदाधिकारी महेश ईखारे, संतोष मडावी, परमेश्वर येणकीकर, ईश्वर नाकाडे, युवराज वंजारी, राजेश डोर्लीकर, गोपाल मेश्राम, ओ.पी. गायधने, प्रभू मते, दिगांबर गभने, विजय ठाकूर, सुधीर माकडे, कालिदास माकडे, सुधाकर देशमुख, अशोक वैद्य, राजेश धुर्वे, सचिन कुकडे, संजय पंचबुद्धे, महिला पदाधिकारी निर्मल भोंगाडे, वनिता सार्वे, अंजली घरडे यांनी केले.अखेर मिळाला दिलासाशासनाने शासकीस, निमशासकीय सेवेत २००५ नंतर रूजू झालेल्या कर्मचाºयांना १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन अंशदायी पेन्शन योजना डीसीपीएस, एनपीएस सुरू केली. संपूर्ण राज्यात २००५ नंतर सेवेतील चार हजार कर्मचाऱ्यांचा मृत्यु झाला आहे. त्यात भंडारा जिल्ह्यातील कृषी, महसूल, वनविभाग, प्राथमिक शिक्षक अशा विविध विभागातील ३० कर्मचाºयांचा समावेश आहे. त्यांना शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत न मिळाल्याने ते कुटुंबिय अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. एकीकडे आमदार, खासदारांना ५ वर्षाच्या निवृत्तीनंतर लगेच पेंशन योजना सुरू होते. परंतु अनेक वर्षे शासकीय सेवेत घालवल्यानंतरही आज या कुटुंबाची फरफट होत आहे.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन