रोजगार हमी कामांची देयके प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 22:18 IST2017-11-26T22:17:57+5:302017-11-26T22:18:09+5:30
तुमसर तालुक्यातील रोजगार हमी योजनेचे अकुशल व कुशल कामांची देयके अद्यापपर्यंत मिळाली नाहीत. मजुरांना मजुरी मिळाली नाही. आॅनलाईन कामे व कागदी कामे करूनही मजुरी व देयके का मिळाली नाही.

रोजगार हमी कामांची देयके प्रलंबित
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर तालुक्यातील रोजगार हमी योजनेचे अकुशल व कुशल कामांची देयके अद्यापपर्यंत मिळाली नाहीत. मजुरांना मजुरी मिळाली नाही. आॅनलाईन कामे व कागदी कामे करूनही मजुरी व देयके का मिळाली नाही. या संदर्भात तुमसर खंडविकास अधिकाºयांना पंचायत समिती सदस्यांनी निवेदन दिले.
रोजगार हमींचे कामे केल्यानंतर मजुरांना त्वरीत मजुरी देण्याचा कायदा आहे. ती देयके अद्याप मिळाली नाहीत. कुशल व अकुशल कामांचे देयके केव्हा मिळणार असा प्रश्न तुमसर पंचायत समिती सदस्य तथा माजी जि.प. सदस्य सदस्यांनी सहाय्यक गटविकास अधिकाºयांना विचारला. त्या आशयाचे निवेदन त्यांना दिले.
दिवाळीसारख्या सणातही मजुरांना मजुरी मिळाली नाही. आॅनलाईन कामांची माहिती शासनाला सादर करण्यात येते. त्याचा काय उपयोग असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
निवेदन देताना शिष्टमंडळात पंचायत समितीचे गटनेते हिरालाल नागपुरे, शिशुपाल गौपाले, राजू गाढवे, माजी जि.प. सदस्य सुरेश राहांगडाले, रायुकाँ जिल्हा महासचिव ठाकचंद मुंगुसमारे उपस्थित होते.