४८ तासात पोहोचणार पेंचचे पाणी

By Admin | Updated: June 29, 2014 23:47 IST2014-06-29T23:47:11+5:302014-06-29T23:47:11+5:30

भंडारा : पावसाच्या विलंबामुळे आणि सिंचन सुविधाअभावी भंडारा आणि मोहाडी तालुक्यातील धानाच्या पऱ्हे करपत आहेत. पऱ्हे वाचविण्यासाठी किसान गर्जनाने पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी केली होती.

Pench water will reach in 48 hours | ४८ तासात पोहोचणार पेंचचे पाणी

४८ तासात पोहोचणार पेंचचे पाणी

भंडारा :भंडारा : पावसाच्या विलंबामुळे आणि सिंचन सुविधाअभावी भंडारा आणि मोहाडी तालुक्यातील धानाच्या पऱ्हे करपत आहेत. पऱ्हे वाचविण्यासाठी किसान गर्जनाने पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानंतर दोन दिवसात पाणी सोडण्याचे आश्वासन पेंच प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता किशोर वरंभे यांनी दिली.
भंडारा जिल्ह्यात पावसाच्या विलंबामुळे शेतकऱ्यांनी केलेली पेरणी करपत आहे. हे पऱ्हे वाचविण्यासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी सोडा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा याबाबत किसान गर्जनाचे अध्यक्ष राजेंद्र पटले यांनी दिला होता. त्यानंतर पेंच प्रकल्पाने घेतलेल्या निर्णयानंतर पाणी सोडण्यात आले. येत्या ४८ तासात हे पाणी भंडाऱ्यात पोहोचण्याची अपेक्षा आहे. यासंदर्भात राजेंद्र पटले म्हणाले, पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली. त्यानंतर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता किशोर वरंभे यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली असता त्यांनी पाणी सोडण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
पऱ्ह्यांसाठी संजीवनी ठरणार
धानाच्या नर्सरीसाठी बावनथडी प्रकल्प, चांदपूर जलाशय आणि पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी १५ दिवसांपासून किसान गर्जना करीत आहे. अखेर त्यांच्या लढ्याला यश आले आहे. तुमसर तालुक्यातील बावनथडी आणि चांदपूर जलाशयाचे पाणी नहराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळाल्यामुळे करपणाऱ्या पऱ्ह्यांना नवसंजिवनी मिळाली आहे. आता भंडारा आणि मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना पेंच प्रकल्पाच्या पाण्याची प्रतीक्षा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Pench water will reach in 48 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.