पेंचच्या पाणी पुरवठ्याची मागणी
By Admin | Updated: October 17, 2015 01:13 IST2015-10-17T01:13:16+5:302015-10-17T01:13:16+5:30
खरीप हंगामातील धानपिक परिपक्वतेवर आले आहे. पिकाला पाण्याची नितांत गरज आहे.

पेंचच्या पाणी पुरवठ्याची मागणी
जवाहरनगर : खरीप हंगामातील धानपिक परिपक्वतेवर आले आहे. पिकाला पाण्याची नितांत गरज आहे. कमी पाणी व वाढीव विद्युत पुरवठा ऐवजी कमी विद्युत पुरवठामुळे धानपिक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याकरीता पेंचचे पाणी व वाढीव विद्युत पुरवठा करण्याची मागणी राजेदहेगाव येथील २६ शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
तालुक्यातील शेवटच्या पश्चिम टोकावर व माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्या दत्तक गाव राजेदहेगाव येथील धानपिकाला पाण्याची अत्यंत गरज आहे. यापुर्वी मागील वर्षी पेंच कालवा याच्या हलगर्जीमुळे राजेदहेगाव परिसर दुष्काळात गणला गेला होता. तीच परिस्थिती आज उद्भवत आहे. २४ तासापैकी कृषीबहुल क्षेत्रात आठ तास विद्युत पुरवठा ऐवजी पाच तास विद्युत पुरवठा होत आहे. यातही विद्युत खंडीत दुरूस्तीच्या नावाखाली प्रवाह बंद करण्यात येतो. याउलट खरबी पेंच कालव्याद्वारे अत्यल्प प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत आहे. यांच्या गावाच्या शेजारी म्हणजे अर्जामंत्री यांच्या मतदार क्षेत्रातील कोटगाव, मोहाळी, चिरव्हा, गोवरी (मौदा) भागात २४ तास विद्युत व कालव्याद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. हा एक राजेदहेगाव गावावर अन्य नाही काय असा प्रश्न येथील शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकरी सनदशीर मार्गाचा वापर करीत आंदोलन करण्याचा इशारा माजी सरपंच भिमेश ढोबळे, प्रशांत इटनकर, कचरू हुमणे, गंगाधर थोटे, दिलीप वैरागडे, शेषराव पत्रेसह सत्तावीस २७ शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. (वार्ताहर)