दोन महिन्यांपासून वेतन रखडले
By Admin | Updated: May 23, 2015 01:04 IST2015-05-23T01:04:46+5:302015-05-23T01:04:46+5:30
भंडारा जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे वेतन दोन महिन्यापासून तर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन झाले नाही.

दोन महिन्यांपासून वेतन रखडले
तुमसर : भंडारा जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे वेतन दोन महिन्यापासून तर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन झाले नाही. एक तारखेला वेतन देण्याचा दावा फोल ठरला आहे. २५ मे पासून लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा भंडारा जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने दिला आहे.
भंडारा जिल्हा परिषदेतील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे मार्च व एप्रिल चे नियमित वेतन तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे फरवरीचे नियमित वेतन अजूनपर्यंत झाले नाही. सुट््टयांचे महिने, लग्न समारंभ असल्याने खर्च कसा भागवायचे अशा विंवचणेत कर्मचारीवृंद आहे. दर महिन्याच्या एक तारखेला शालेय शिक्षण विभागाने कर्मचाऱ्यांचे वेतन झाले पाहिजे असा नियम तयार केला आहे. वेतन पध्दती आॅन लाईन करण्यात आले आहे. इतके अपडेट झाल्यावरही वेतन रखडले आहे.
२४ मे पर्यंत वेतन न झाल्यास २५ मे ला सकाळी ११ पासून भंडारा जि. प. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
भंडारा जिल्ह्यत जिल्हा परिषद, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत शिक्षक व शिक्षकेततर कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ३७५ इतकी आहे. नियमांचा गाडा हाकणारे शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या डझनभर आहे. अनेक उपक्रम शासन स्तरावर राबविण्यात येतात, पंरतु वेतनासंदर्भात पाठपुरावा केला जात नाही असे दिसते. (तालुका प्रतिनिधी)