दुधाचे १८ कोटींचे देयक अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 06:00 AM2019-12-02T06:00:00+5:302019-12-02T06:01:09+5:30

भंडारा जिल्ह्यात पारंपरिक धान उत्पादनासह पूरक व्यवसाय म्हणून दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. हा व्यवसाय नगदी पिकासारखा असून शेतकरी आपला प्रपंच चालवित असतो. जिल्ह्यात दुधाचा व्यवसाय सुमारे ४०० कोटींच्या घरात आहे. एकट्या भंडारा जिल्हा दूध संघाचा व्यवसाय हा १०० कोटींचा आहे. जिल्ह्यात ३५० दूध संस्था असून या संस्था जिल्हा दूध संघाला दुधाचा पुरवठा करतात. तर दूध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सुमारे ३० हजारांच्या घरात आहे.

Payment of 18 crores of milk stopped | दुधाचे १८ कोटींचे देयक अडले

दुधाचे १८ कोटींचे देयक अडले

Next
ठळक मुद्देसंस्थाचालकांचा जिल्हा दुग्ध संघाला घेराव : दुधाचा पुरवठा न करण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाने दुधाचा पुरवठा करणाऱ्या संस्थांचे गत १६० दिवसांचे १८ कोटींचे देयक अडविल्याने संस्था व दूध उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. दुधाचे देयक तात्काळ देण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी शेकडो संस्था पदाधिकाऱ्यांनी संघाचे माजी अध्यक्ष विलास काटेखाये यांच्या नेतृत्वात जिल्हा दूध संघाला घेराव घातला. १० दिवसात देयक न दिल्यास संघाला दुधाचा पुरवठा न करण्याचा इशारा दूध संस्था चालकांनी यावेळी दिला.
भंडारा जिल्ह्यात पारंपरिक धान उत्पादनासह पूरक व्यवसाय म्हणून दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. हा व्यवसाय नगदी पिकासारखा असून शेतकरी आपला प्रपंच चालवित असतो. जिल्ह्यात दुधाचा व्यवसाय सुमारे ४०० कोटींच्या घरात आहे. एकट्या भंडारा जिल्हा दूध संघाचा व्यवसाय हा १०० कोटींचा आहे. जिल्ह्यात ३५० दूध संस्था असून या संस्था जिल्हा दूध संघाला दुधाचा पुरवठा करतात. तर दूध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सुमारे ३० हजारांच्या घरात आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या जिल्हा दूध संघाने अचानकपणे एप्रिल २०१९ पासून दूध संस्था व शेतकऱ्यांचे देयक अडवून ठेवले आहे. संस्थांचे देयक अडविल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या अनेक लहान संस्था बंद पडल्या आहेत. परंतु, त्यांचे देयक अदा करण्यात आले नाही.
या संस्थांचे १६० दिवस अर्थात १६ आठवड्यांचे देयक तातडीने देण्यात यावे, यासाठी दूध संघाकडे पाठपुरावा करण्यात आला. परंतु, आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. अखेरीस, शनिवारी शेकडो संस्थाचालकांनी संघाचे माजी अध्यक्ष विलास काटेखाये यांच्या नेतृत्वात दूध संघाला घेराव घालून देयक अदा करण्याची मागणी लावून धरली. आता देयकाची प्रतीक्षा आहे.

Web Title: Payment of 18 crores of milk stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :milkदूध