रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:25 IST2021-07-16T04:25:05+5:302021-07-16T04:25:05+5:30

शरीर निरोगी राहण्यासाठी पोषक आहार तर आवश्यक आहे; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नेमके काय खावे म्हणजे कोरोनाच ...

Pay special attention to diet to boost immunity | रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष द्या

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष द्या

शरीर निरोगी राहण्यासाठी पोषक आहार तर आवश्यक आहे; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नेमके काय खावे म्हणजे कोरोनाच होणार नाही, हा प्रश्न सर्वांनाच पडत आहे; मात्र शरीर निरोगी राहण्यासाठी पोषक आहारासोबतच दररोज शरीराला व्यायामाचीही गरज आहे. दररोज दूध, हळद, फळे आहारात असणेही खूप गरजेचे असल्याचा सल्ला डॉक्टर, आहारतज्ज्ञ, योगतज्ज्ञ नागरिकांना देत आहेत.

बॉक्स

कच्च्या पालेभाज्यांचे आहारातील महत्त्व

आपल्या आहाराचे पिष्टमय, नत्रयुक्त, चरबीयुक्त, क्षार, जीवनसत्वे व पाणी हे घटक आहेत. त्यापैकी क्षार व जीवनसत्त्वे आपल्याला ताज्या भाज्यांमधून मिळतात. आपल्या शरीराच्या वाढीसाठी क्षार व जीवनसत्वे गरजेची आहेत. अंडी, दूध पिणे आपल्या हाडांसाठी फायदेशीर असते. यामुळे आपली हाडे मजबूत होतात. त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. दुधामुळे पचन होण्यास मदत होते. प्रथिनांच्या पचनासाठी ‘अ’ जीवनसत्त्व, कर्बोदकांच्या पचनासाठी ‘ब’ जीवनसत्त्व तर स्निग्ध पदार्थाच्या पचनासाठी ‘ई’ जीवनसत्त्वाची गरज असते. हाडांच्या बळकटीसाठी ‘ड’ जीवनसत्त्व, रक्तासाठी ‘के’ जीवनसत्त्व आपल्याला आहारातून मिळणे गरजेचे असते. ही सर्व जीवनसत्त्वांची गरज आपण विविध पालेभाज्या आणि कडधान्यातून भागवता येते.

Web Title: Pay special attention to diet to boost immunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.