निवृत्तिवेतन दरमहा १ तारखेला अदा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:24 IST2021-07-21T04:24:00+5:302021-07-21T04:24:00+5:30
भंडारा : नियत वयोमानानुसार जिल्हा परिषद सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन दर महिन्याला उशिरा मिळत आहे. त्याला तारखेचे मुळीच ...

निवृत्तिवेतन दरमहा १ तारखेला अदा करा
भंडारा : नियत वयोमानानुसार जिल्हा परिषद सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन दर महिन्याला उशिरा मिळत आहे. त्याला तारखेचे मुळीच बंधन नाही. निवृत्ती वेतनधारकांचे जीवन या वेतनावरच अवलंबून असते. त्यामुळे वेळेवर निवृत्तिवेतन न मिळाल्यास अडचणींचा सामना करावा लागतो. शासनाकडून वेळेवर तरतूद प्राप्त होत नाही.
शासनाने याची गंभीर दखल घ्यावी. दरमहा १ तारखेला निवृत्तिवेतन होईल, अशी व्यवस्था करण्यात यावी. तसेच सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे हप्ते एकाच वेळी देण्यात यावे. याकरिता शासनाने वेळीच तरतूद उपलब्ध करून द्यावी. याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, भंडारामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष भगीरथ नागलवाडे, सदस्य अ. बु. चिचामे, गोवर्धन कराड, सुरेश भवसागर, वसंत धाबेकर, वसंत चामट, फाल्गुन बोंद्रे उपस्थित होते.