१ तारखेलाच वेतन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2015 00:45 IST2015-10-15T00:45:16+5:302015-10-15T00:45:16+5:30
विविध मागण्यांना घेऊन अखिल भारतीय शिक्षक संघाच्या भंडारा शाखेने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांना निवेदन देऊन चर्चा केली.

१ तारखेलाच वेतन द्या
मुख्याधिकाऱ्यांना निवेदन : शिक्षक संघाची सीईओंशी चर्चा
भंडारा : विविध मागण्यांना घेऊन अखिल भारतीय शिक्षक संघाच्या भंडारा शाखेने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांना निवेदन देऊन चर्चा केली.
यावेळी माहे सप्टेंबर २०१५ चे वेतन देवून दरमहा शिक्षकांचे वतन एक तारखेला नियमित करण्यात यावे, प्रसुती रजा वैद्यकीय रजा, अर्जित रजा, चट्टोपाध्याय थकबाकी, सहावे वेतन आयोग थकबाकी, वेतन तफावत, वैद्यकीय परिपूर्ती देयकाची थकीत बिले काढण्यासाठी पं.स. स्तरावर निधी उपलब्ध करून देण्यात यावे, २००५ नंतर लागलेल्या प्राथमिक शिक्षकांचे कापण्यात आलेल्या डीसीपीएस रक्कमेचा हिशेब मिळण्याबाबत कपात झालेली रक्कम त्यांच्यात जमा करणे, ज्यांचे अकाऊंट काढले नाहीत त्यांचे अकाऊंट काढून कपात झालेली रक्कम जमा करावे, २००६ पासून प्राथमिक शिक्षकांचा स्थानांतरण प्रवास भत्ता देणे, सन १९९५ पासून कार्यरत सर्व प्राथमिक शिक्षकांना सेवेत कायम असल्याचे आदेश देणे, २४ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना निवडश्रेणी प्रशिक्षण आणि प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांना निवड श्रेणी लागू करणे, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, पदवीधर प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे शिक्षक संवर्गातून भरावे, २०१४-१५ ची भविष्य निर्वाह निधीच्या पावती देणे, सर्वपदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर या पदासाठी लागू असलेली वेतन श्रेणी लागू करणे, सहावे वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीला मान्यता प्रदान करून सेवापुस्तकांना नोंद घेणे, प्राथमिक शिक्षकांचे वेतन शाळा स्तरावर न काढता पंचायत समिती स्तरावर करण्यात यावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
निवेदन देताना जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे, केशव बुरडे, शंकर नखाते, रामा कांबळे, नेपाल तुरकर, रमेश काटेखाये, रवी नखाते, नरेश कोल्हे, अशोक ठाकरे, डी.डी. दमाहे, यशपाल बगमारे, अरुण बघेले, किशोर ईश्वरकर, एम.पी.वाघाये, बाळकृष्ण भुते, अशोक हजारे, कोमल चव्हाण, सुरेश कोरे, रवी उगलमुगले, सुधीर माकडे, उमाकांत इंदुरे, मुकेश मेश्राम, योगेश कुटे, दिलीप ब्राम्हणकर, तुळशीदास पटले, विजर चाचरे उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
जोपर्यंत मूळ पेन्शन योजना शिक्षकांना लागू होत नाही तोपर्यंत अखिल भारतीय शिक्षक संघाचा लढा सुरू राहील.
-रमेश सिंगनजुडे,
जिल्हाध्यक्ष.
अशैक्षणिक कामे देऊ नका
शिक्षकांना अध्यपनाऐवजी अन्य कामे देऊ नका, या मागणीसाठी महाराष्ट राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद यांच्या नेतृत्त्वात शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांची भेट घेतली. त्यानंतर या शिष्टमंडळाने शासनाच्या परिपत्रकाची माहिती पटवून दिली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून शिक्षकांच्या समस्या सांगताना शासन परिपत्रकाचा हवाला देत शिक्षकांना शाळेवर नियुक्त केलेल्या सेवा त्यांच्या मुळ अध्यापन कार्याऐवजी इतर शाळाबाह्य कामासाठी वापरणे अनुचित असल्याचे शासन परिपत्रकात आहे. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिाया वगळता इतर कोणत्याही प्रयोजनार्थ राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था अथवा खाजगी संस्थेद्वारा संचालित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या सेवा वापरण्यात येऊ नयेत, असे नमूद आहे. त्या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील शिक्षकाकडे सोपविलेले बीएलओ आणि एनपीआरच्या कामातून वगळण्यात यावे या आशयाचे पत्र कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.