लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्याच्या निषेध करण्यासाठी व्यापारी संघ पवनी, पवनी तालुका औषधी विक्रेता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पवनी बंद ची हाक देण्यात आली होती. या बंदला नागरिकांसह व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून कडकडीत बंद पाळला.पवनी नगरातील किराणा, कापड, चहा, भाजीपाला, फळ विक्रेते, रेस्टॉरंट, व औषध विक्रेत्यांनी व्यापारी संघाचे आव्हानास प्रतिसाद देऊन कडकडीत बंद पाळला. औषध विक्रेत्यांनी अर्धा दिवस बंद पाळुन सहकार्य केले. सायंकाळी ६.३० वाजता गांधी चौकातून नगरातील प्रमुख रस्त्याहून कँडल मार्च काढण्यात आला. या रॅलीच्या समारोप प्रसंगी गांधी चौकात श्रद्धांजली सभा व सामूहिक श्रद्धांजली अर्पण करून शहिदांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी वातावरण गंभीर झाले होते. यावेळी नगरातील सर्व व्यावसायिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.व्यापारी संघाचे अध्यक्ष विजय बावनकर, सचिव प्रशांत पिसे, उपाध्यक्ष राजू चोपकर, औषधी विक्रेता संघाचे अध्यक्ष सतिश लेपसे, प्रकाश नखाते, राजेश कळमकर, बाळकृष्ण कलंत्री, महेंद्र ईनकने, विलास काटेखाये, प्रकाश पचारे, कमलाकर रायपुरकर, विजय पाटील, शंकरराव तेलमासरे, लिलाधर काटेखाये, रामभाऊ भेंडारकर, राजूभाई ठक्कर, अविनाश पाटिल, सुरेश अवसरे, मनोज माळवी, मुनेश्वर गोमासे, दिपक भांडारकर, संतोष मारवाडकर, अशोक पारधी, लक्ष्मीकांत तागडे, मुन्ना तिडके, जितू तिडके, महादेव शिवरकर, जनार्धन भांडारकर. नालंदा वसतीगृह, सिद्धार्थ वसतीगृहाचे विद्यार्थी - विद्याथीर्नींनी तसेच नागरिकांनी स्वयंप्रेरणेने कँडल मार्चमध्ये सहभाग घेतला.पालांदुरात सामूहिक श्रद्धांजलीपालांदुर : जम्मू कश्मीर येथील पुलावामा येथे घडलेल्या भ्याड हल्ल्यात भारत मातेच्या जवानांना वीर मरण आले. त्यांना श्रध्दांजली देण्यासाठी पालांदूरात सामुहिक कार्यक्रमाचे आयोजन येथील बाजार चौकातील राष्टÑसंताच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर करण्यात आले होते. सदर आयोजन शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले. यावेळी गावातील ज्येष्ठ मंडळीसह गोंविद विद्यालयाचे विद्यार्थी, महिला भगीनी उपस्थित होत्या. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘वीर जवान अमर रहे’ आदी घोषणांसह पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा देण्यात आल्या.
पुलवामा घटनेच्या निषेधार्थ पवनीत कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 22:51 IST
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्याच्या निषेध करण्यासाठी व्यापारी संघ पवनी, पवनी तालुका औषधी विक्रेता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पवनी बंद ची हाक देण्यात आली होती. या बंदला नागरिकांसह व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून कडकडीत बंद पाळला.
पुलवामा घटनेच्या निषेधार्थ पवनीत कडकडीत बंद
ठळक मुद्देशहीद जवानांना श्रद्धांजली : व्यापारी संघाचा सक्रिय सहभाग, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा