शेतकऱ्यांच्या डोक्यावरील भाराला मिळणार विराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2016 00:40 IST2016-01-16T00:40:06+5:302016-01-16T00:40:06+5:30

शेतकऱ्यांना नेहमी शेतात जाण्यासाठी ज्या पांदण रस्त्याची गरज भासत होती. त्याच्या दुरूस्तीकडे शासनाने दुर्लक्ष केले होते.

Pause on the head of farmers | शेतकऱ्यांच्या डोक्यावरील भाराला मिळणार विराम

शेतकऱ्यांच्या डोक्यावरील भाराला मिळणार विराम

पांदण रस्त्याच्या कामाला सुरूवात : शेतकऱ्यांच्या बांध्यावर पोहोचेल बैलबंडी, सरपंचाचे प्रयत्न लागले फळाला
पालांदूर : शेतकऱ्यांना नेहमी शेतात जाण्यासाठी ज्या पांदण रस्त्याची गरज भासत होती. त्याच्या दुरूस्तीकडे शासनाने दुर्लक्ष केले होते. मात्र, ढिवरखेड्याचे सरपंच गजानन शिवणकर यांनी सतत पाठपुरावा करून मातीकाम व खडीकरणाकरिता १५ लक्ष रुपयांचा निधी खेचून आणला.
कामाला आरंभ करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची शेतीत लागणारे साहित्य, बीयाणे डोक्यावरुन वाहून न्यावे लागत होते. रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या बांध्यापर्यंत थेट बैलबंडी व वाहन जाणार असून साहित्य वाहून नेण्याच्या त्रासातून सुटका होईल असा विश्वास आहे.
फत्तुपुरी ते नागो थेर यांच्या शेताकडे जाणारा रस्ता १२०० मीटर रस्ता अत्यंत खराब अवस्थेत सापडला होता. रस्ता होता पण पूर्णत्वाकडे नेणारा नसल्याने कित्येकांचे प्रयत्न अपूरे पडले. या रस्त्याला केवळ शासनस्तरावरुन निधीच मिळणे गरजेचे नव्हते तर लाभार्थी शेतकऱ्यांची जमीनसुध्दा हवी होती. याकरिता समन्वयात्मक भूमिका सरपंच गजानन शिवणकर यांनी घेत जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांशी सकारात्मक चर्चा करीत रस्त्याला हिरवी झेंडी मिळविली.
ढिवरखेड्याचे सरपंचानी पुढाकार घेत शेकडो शेतकऱ्यांना शेतीची सर्व कामे डोक्यावरुन करावी लागत असत. अनेक संकटाचा सामना करीत शेती पिकवावी लागत असे. आता संकटांना पूर्णविराम मिळाला. यावेळी सरपंच गजानन शिवणकर, ग्रामसेवक राहुल ठवकर, उपसरपंच भाष्कर हत्तीमारे, भुदेव किंदर्ले, आनंद हत्तीमारे, मार्कंड हत्तीमारे, रामभाऊ थेर, रोजगार सेवक युवराज शहारे, लिपीक प्रवीण मेश्राम आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Pause on the head of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.