मोहाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड
By Admin | Updated: October 21, 2014 22:47 IST2014-10-21T22:47:34+5:302014-10-21T22:47:34+5:30
येथील ग्रामीण रुग्णालयात गरीब घरातील रुग्णांची मोठीच हेळसांड होत असून याकडे लक्ष देण्यासाठी कुणाजवळही वेळ नाही, अशी प्रतिक्रिया अनेक रुग्णांनी व्यक्त केली आहे.

मोहाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड
मोहाडी : येथील ग्रामीण रुग्णालयात गरीब घरातील रुग्णांची मोठीच हेळसांड होत असून याकडे लक्ष देण्यासाठी कुणाजवळही वेळ नाही, अशी प्रतिक्रिया अनेक रुग्णांनी व्यक्त केली आहे.
मोहाडी तालुक्यात ग्रामीण रुग्णालय हा मोहाडीतील एकमात्र मोठा रुग्णालय आहे. मात्र या रुग्णालयातील कर्मचाऱ्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वचक नसल्याने येथे सर्व आलबेल कारभार सुरू आहे. दि.९ आॅक्टोंबरला येथील एनसीडी कार्यालय हे १० वाजेपर्यंत बंद होते तर औषधी वाटप केंद्रही बंद होते. सकाळी साडेआठ वाजता तपासणीसाठी आलेले रुग्ण १० वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांची वाट पाहत या विभागाच्या बाहेर बसलेले किंवा उभे होते. येथील एनसीडी विभागात चार ते पाच कर्मचारी आहेत. स्टाप नर्स खाती चौरे, टेक्नीशियन माधुरी नरड, फिजोथेरिपिस्ट शाकीन शेख तसेच कॉन्सीलर हे ९ आॅक्टोंबरला १० वाजेपर्यंत रुग्णालयात आलेच नव्हते. त्यांची वाट पाहात रुग्णांना झोप येत होती. तिच परिस्थिती औषधी वाटप केंद्राची होती. तेथेही अनेक रुग्ण औषधी घेण्यासाठी गर्दी करून उभे होते. या रुग्णालयातील बहुतांश विभागाची कमी जास्त प्रमाणात हीच अवस्था आहे. ही समस्या एका दिवसाची नाही तर दररोज हीच समस्या असते. येथील या विभागाचे कर्मचारी मुख्यालयी राहात नसून बाहेरगावावरून येणे जाणे करतात. त्यामुळे ते सकाळी ८३० वाजता कधीच येत नाही. तर दररोज ९.३० ते १० च्या दरम्यानच रुग्णालयात येतात, असे अनेक रुग्णांचे म्हणने आहे. ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथील कर्मचाऱ्यांनी सकाळी वेळेवर उपस्थित राहण्यासाठी वरिष्ठ अधिकऱ्यांनी निर्देश द्यावे, अशी मागणी येथील जनतेनी केली आहे.