उपजिल्हा रुग्णालयात नाव नोंदणीसाठी रुग्णांच्या रांगा
By Admin | Updated: June 5, 2014 23:49 IST2014-06-05T23:49:32+5:302014-06-05T23:49:32+5:30
तुमसर येथील शासकीय सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडल्याचे चित्र दिसून येत आहे. येथे बाह्यरुग्ण विभागात नेहमीच रुग्णांच्या रांगाच रांगा दिसतात. डॉक्टरांच्या संपकाळात

उपजिल्हा रुग्णालयात नाव नोंदणीसाठी रुग्णांच्या रांगा
तुमसर : तुमसर येथील शासकीय सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडल्याचे चित्र दिसून येत आहे. येथे बाह्यरुग्ण विभागात नेहमीच रुग्णांच्या रांगाच रांगा दिसतात. डॉक्टरांच्या संपकाळात येथे केवळ आठ कंत्राटी डॉक्टरांची सेवा सुरू होती. येथे सध्या १४ पदे रिक्त आहेत. त्यात एक डॉक्टर व वैद्यकीय अधिक्षक पदाचा समावेश आहे.
तुमसर शहर व तालुक्यातील सुमारे तीन लाख नागरिकांच्या आरोग्याची काळजी शासकीय सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालय होते. मध्यप्रदेशातूनही येथे नागरिक रुग्ण मोठय़ा प्रमाणात येतात. १00 खाटांचा हा दवाखाना स्वत: आजारी असल्याचे येथे दिसते. डॉक्टरांच्या संपकाळात (३१ मे) या दवाखान्यात आठ कंत्राटी डॉक्टरांनी जिकरीची सेवा रुग्णांना दिली. यात सहा राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, आयुषचे वैद्यकीय अधिकारी व आयुष वैद्यकीय अधिकार्यांचा समावेश होता. यात तीन पुरूष व तीन महिला डॉक्टर्स होत्या तर दोन आयुष वैद्यकीय अधिकारी होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने येथे रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. बाह्यरुग्ण विभागात स्वत: रुग्णाला नाव नोंदणीकरीता रांगेत उभे राहावे लागते. नाव नोंदणी करणारे कर्मचारी येथे नेहमी एकच दिसतो. निदान ते तीन असायला पाहिजे स्वत: आजारी व्यक्ती रांगेत किती वेळ उभा राहू शकेल निदान याचा विचार रुग्णालय प्रशासनाने करावयास पाहिजे. येथे मंजूर पदे ९४ आहेत. सध्या ८0 कर्मचारी कार्यरत असून १४ पदे रिक्त आहेत. त्यात एका डॉक्टरचे पद रिक्त आहे. येथील वैद्यकीय अधिक्षक प्रभारी असून दोन वर्षापासून कायम वैद्यकीय अधिक्षक पद भरण्यात आले नाही. परिचारकांचे सहा पद रिक्त आहेत. वर्ग ३ चे ७ तथा वर्ग चार चे चार पदे येथे रिक्त आहेत. येथे डॉक्टरांची संख्या १२ आहे. यात पुरूष डॉक्टर्स १0 तर महिला डॉक्टर्स दोन आहेत. परिचारीकेंची एकूण संख्या २१ तर कार्यालयीन कर्मचारी संख्या ४0 आहे. आठ वर्षापुर्वी या रुग्णालयाने राज्यस्तरीय आनंदीबाई जोशी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला होता हे विशेष. आरोग्य विभागाने येथे लक्ष देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)