प्रवाशांनी अनुभवला थरार

By Admin | Updated: June 20, 2015 01:08 IST2015-06-20T01:08:01+5:302015-06-20T01:08:01+5:30

प्रवासादरम्यान रात्रीच्या वेळी अचानक दमदार पावसाने हजेरी लावताच बस चालकाने दर्शनी भागावरील वायफर सुरु केले मात्र ते वायफर बंद स्थितीत असल्याने .....

Passengers thump experience | प्रवाशांनी अनुभवला थरार

प्रवाशांनी अनुभवला थरार

तुमसर : प्रवासादरम्यान रात्रीच्या वेळी अचानक दमदार पावसाने हजेरी लावताच बस चालकाने दर्शनी भागावरील वायफर सुरु केले मात्र ते वायफर बंद स्थितीत असल्याने जीव मुठीत घेऊन बस चालविताना थरार बसमधील प्रवाशांनी अनुभवला. ही घटना १८ जूनला रात्री नागपूरवरुन तुमसरकडे येत असतांना घडली.
सुरक्षित प्रवास एस.टी. चा प्रवास असे एस.टी. चे ब्रिद वाक्य असल्याने नागरिकांनीही एस. टी. त प्रवास करण्यास पहिली पसंती दिली परिणामी अव्वाचा सव्वा भाडे वाढ होवूनही नागरिक आजही एस. टी. च्या बसमध्ये प्रवास करणाऱ्यांचे प्रमाणे मोठे आहे. मात्र भरमसाठ पैसे कमविण्याच्या नादात बस गाड्याकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात येत असून भंगारात जमा होणाऱ्या तसेच कालबाह्य बस गाड्या रस्त्यावरुन धावतांनी दिसत असून कितीतरी तुमसर अगारातील बसगाड्यांचे अपघाताचे किस्से लिहिल्या गेले पंरतु तुमसर आगाराला अजुनही जाग न आल्याचे चित्र १८ जूनला रात्री घडलेल्या घटनेवरुन दिसते.
१८ जूनला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास तुमसर आगाराची नागपुर- तुमसर बस एम ४० - ९४०४ जलद बस नागपुर स्थानकावर ३० ते ४० प्रवासी घेऊन निघाली असता मौदानजीक पावसाने हजेरी लावली असता. तुमसर आगरातील बस गाड्याचे सर्व पितळ उघडे पडले. वायफर बंद स्थितीत असतांना रस्त्यावर काहीही दिसत नसतांना मात्र बस चालकाने जीव मुठीत घेवून हळूवार बस गाडी हाकत तुमसर बस स्थानकापर्यंत आणत असतांना बस मध्यल्या २० ते २५ प्रवाशांनी हा थरार अनुभवला. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Passengers thump experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.