रेल्वे तिकिटांसाठी प्रवाशांच्या रांगा
By Admin | Updated: May 22, 2014 00:51 IST2014-05-22T00:51:12+5:302014-05-22T00:51:12+5:30
तुमसर रोड दक्षिण पूर्व रेल्वेस्थानकावर तिकीट खरेदी करणार्या प्रवाशांची लांबच लांब रांग

रेल्वे तिकिटांसाठी प्रवाशांच्या रांगा
तुमसर : तुमसर रोड दक्षिण पूर्व रेल्वेस्थानकावर तिकीट खरेदी करणार्या प्रवाशांची लांबच लांब रांग सध्या दिसत असून अनेक प्रवाशांना गाडीच्या वेळेआधी तिकीट मिळत नसल्याने पुढील प्रवास करताच येत नाही. रेल्वे प्रशासनाने निदान उन्हाळ्यात अतिरिक्त काउंटरची सोय करण्याची आवश्यकता असताना येथे दुर्लक्ष केल्या जात आहणे. सध्या उन्हाळा असून सुटीचे दिवस आहेत. त्यामुळे स्वस्त व जलद प्रवासाकरिता सर्वसामान्य नागरिक रेल्वेने प्रवास करतात. प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिदवाक्य रेल्वेचे आहे. परंतु येथे रेल्वे प्रवाशांना मोठा शारीरिक व मानसीक त्रास सहन करावा लागतो. तिकीट खिडकीवर प्रचंड मोठय़ा रांगा येथे प्रवाशांना दिसत आहेत. रेल्वे आरक्षण करण्याकरिता सुद्धा येथे लांब रांगा दिसतात. येथे रेल्वे आरक्षण खिडक्या दोन आहेत. परंतु सध्या केवळ एकच काउंटर सुरु आहे. दुसरे काउंटर केवळ नावापुरते आहे. गर्दी असताना दुसरे काउंटर रेल्वे प्रशासनाने सुरु करणे गरजेचे आहे. सर्वसामान्य तिकीट खरेदी करणार्या प्रवाशांकरिता केवळ दोन काउंटर तिकीटाकरिता आहेत. लोकल, एक्सप्रेस या प्रत्येक गाड्यांचा येथे थांबा असल्याने प्रवाशांची संख्या येथे मोठी आहेत. सकाळी ८.३0 ते १0.३0 पर्यंत या तिकीट खरेदी काउंटरवर प्रचंड मोठय़ा रांगा दिसतात. गर्दी असल्याने अनेक प्रवाशांना तिकीख खरेदी करताच येत नाही. गाडीचा थांबा दोन ते चार मिनिटांचा असल्याने अनेक प्रवाशांना प्रवास करता येत नाही. उलट्या दुसर्या गाडीने अथवा परत जाण्याची पाळी येथे येते. रेल्वे कर्मचार्यांची संख्या येथे कमी असल्याने दुसरे काउंटर सुरु करण्यात येत नाही अशी माहिती सूत्राने दिली. यापुर्वी अनेकदा तिकीटांसाठी प्रवाशांना त्रास होत असला तरी अद्यापही उपाययोजना करण्यात आली नाही. (तालुका प्रतिनिधी)