बळकटीसाठी युवकांचा सहभाग आवश्यक

By Admin | Updated: March 6, 2016 00:27 IST2016-03-06T00:27:04+5:302016-03-06T00:27:04+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत खासदार प्रफुल पटेल यांच्या मार्गदर्शनात सामाजिक कार्यातून पोहोचला आहे.

Participation of youth is necessary for strengthening | बळकटीसाठी युवकांचा सहभाग आवश्यक

बळकटीसाठी युवकांचा सहभाग आवश्यक

पूर्णा पटेल यांचे प्रतिपादन : तालुका युवक व विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसची सभा
भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत खासदार प्रफुल पटेल यांच्या मार्गदर्शनात सामाजिक कार्यातून पोहोचला आहे. परंतु पक्षात युवक युवतीचा सहभाग कमी जाणवतो. त्यामुळे पक्ष अधिक बळकट करण्यासाठी युवकांचा सहभाग आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँगे्रसचे युवा नेतृत्व पुर्णा पटेल यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका युवक व विद्यार्थी आढावा बैठक शनिवारी भंडाऱ्यात पार पडली. यावेळी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी युवक काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक कारेमोरे होते. अतिथी म्हणून विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील नशिने, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, राकाँचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, जि.प. उपाध्यक्ष राजेश डोंगरे, सभापती शुभांगी रहांगडाले, नगराध्यक्ष बाबुराव बागडे, केतन तुरकर, डॉ.सच्चिदानंद फुलेकर, हाजी सलाम, ज्योती खवास, उत्तम कळवते, नितीन तुमाने आदी उपस्थित होते.
यावेळी पूर्णा पटेल म्हणाल्या, युवक-युवतींच्या सहभागातून तळागाळातील सामान्य कार्यकर्ता पक्षाशी जुळावा, पक्षाच्या संघटन वाढीसाठी त्यांचा हातभार लागावा, पक्षाला घराघरात पोहचविण्यासाठी समाजकार्य महत्वाचे आहे. संचालन पंकज ठवकर यांनी तर आभारप्रदर्शन संजय लांजेवार यांनी केले. यावेळी रूबी चढ्ढा, राजु हेडावू, सुनील साखरकर, धनराज साठवणे, धनंजय ढगे, पार्वता डोंगरे, नीतू सेलोकर, प्रदीप गायधने, सुजाता फेंडर, सुभाष वाघमारे, डॉ. रवींद्र वानखेडे, विजू खेडीकर, आशिष दलाल, सोपान आजबले, राजपूत, सुरेश शहारे, मदन गडरीये उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Participation of youth is necessary for strengthening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.