देशाच्या प्रगतीत सहभागी व्हा

By Admin | Updated: September 22, 2015 00:51 IST2015-09-22T00:51:10+5:302015-09-22T00:51:10+5:30

जीवन जगत असतांना प्रत्येकाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. यासाठी सोयीनुसार नागरिक बँका, पतसंस्था

Participate in the progress of the country | देशाच्या प्रगतीत सहभागी व्हा

देशाच्या प्रगतीत सहभागी व्हा

साकोली : जीवन जगत असतांना प्रत्येकाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. यासाठी सोयीनुसार नागरिक बँका, पतसंस्था किंवा इतर ठिकाणाहून कर्ज घेतात. कर्ज घेऊन आर्थिक अडचण सोडवितात. मात्र परतफेड करतांनी बरेच कर्जदार कर्जाची परतफेड करण्यास धजावत नाही. घेतलेले कर्ज हा जनतेचा पैसा आहे. त्यामुळे कर्ज बुडविणे म्हणजे राष्ट्राचे नुकसान करणे होय. निधीची परतफेड करून देशाच्या प्रगतीत सहभागी व्हा, असे प्रतिपादन प्राचार्य होमराज कापगते यांनी केले.
शनिवारी श्री साई ग्रामीण बिगर सहकारी संस्थेच्या सभेप्रसंगी आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर संस्थेचे उपाध्यक्ष शिवशंकर बावनकुळे, कार्यवाह रेवाराम तिडके, संचालक दामोदर कापगते, धनंजय डोंगरवार, घनश्याम वलथरे, रेवाराम डोंगरवार, भास्कर भेंडारकर, नानेश्वर लोहीकर, शैलेश गजभिये, यादोराव राऊत, सुनीता वाडीभस्मे उपस्थित होते.
यावेळी राहुल काशीवार, वल्लभ बोरकर, मनिष झोडे, अंशुमन कटकवार, दामिनी बन्सोड, तेजस्वीनी डोंगरवार, नितीन काशीवार, जोगीराज गोटेफोडे, नलीनी संग्रामे, स्वाती कावळे, ऐश्वर्या बावने, खुशबू भेंडारकर, तोषित घोरमारे, अंकुराज गणवीर, पुनम देवगीरीकर, तिलकचंद धोटे, यश फुंडे, अक्षय श्रीरांजे, आदित्य बोरकर या गुणवत विद्यार्थ्यांचा शाल व श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
जेष्ठ सभासद म्हणून छगन कापगते साकोली, हरिभाऊ घरडे बेदरा, डॉ. महादेव कापगते सेंदुरवाफा व अर्जुन कोसरे सेंदुरवाफा यांचाही शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन शैलेश गजभिये यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष शिवशंकर बावनकुळे यांनी केले. कार्यक्रमाकरिता व्यवस्थापक भागवत मेश्राम, वरिष्ठ लिपीक शरद ब्राम्हणकर, कनिष्ठ लिपीक विनोद ठाकुर, घनश्याम राऊत, मनोज तिरपुडे यांनी सहकार्य केले. आमसभेला सर्व सभासद उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Participate in the progress of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.