प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST2021-07-15T04:25:07+5:302021-07-15T04:25:07+5:30
या योजनेअंतर्गत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे होणारे पिकांचे नुकसान जसे हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे ...

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घ्या
या योजनेअंतर्गत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे होणारे पिकांचे नुकसान जसे हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड इत्यादी बाबीमुळे उत्पादनात येणारी घट या बाबीकरिता नुकसान भरपाई देण्यात येते.
सदर योजना कर्जदार व बिगर कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेमध्ये समाविष्ट होण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. सदर अर्ज बँक, कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, प्रादेशिक ग्रामीण बँक, आपले सरकार सेवा केंद्र किंवा विमा कंपनीचे अधिकृत विमा प्रतिनिधी यांचेमार्फत विमा हप्ता भरावयाचा आहे. बिगर कर्जदारासाठी अर्जाची अंतिम मुदत १५ जुलै आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना (खरीप) अंतर्गत धान व सोयाबीन दोन्ही पिकांसाठी जोखिमस्तर ७० टक्के निश्चित करण्यात आलेला आहे. पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज करावयाचा अंतिम दिनांक १५ जुलै आहे.
या योजनेअंतर्गत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे होणारे पिकांचे नुकसान जसे हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड आदी बाबीमुळे उत्पादनात येणारी घट आदी बाबीकरिता नुकसान भरपाई देण्यात येते.