आजपासून अंशत: अनलाॅक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 05:00 IST2021-06-07T05:00:00+5:302021-06-07T05:00:23+5:30
भंडारा जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट ७.६७ टक्के असून ऑक्युपाइड ऑक्सिजन बेड ४.४१ टक्के आहे. ज्या ठिकाणी पाॅझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांपेक्षा कमी आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरले आहे, तेथे पहिल्या टप्प्याचे निकष लागू होणार आहेत; परंतु भंडारा जिल्ह्यात भरलेले ऑक्सिजन बेड कमी असले तरी पाॅझिटिव्हिटी रेट कमी असल्याने तो तिसऱ्या टप्प्यात लागत आहे.

आजपासून अंशत: अनलाॅक
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता हळूहळू अनलाॅकची प्रक्रियाही सुरू झाली आहे. राज्य शासनाने ठरविलेल्या निर्देशांनुसार भंडारा जिल्हा तिसऱ्या लेव्हलमध्ये असून आज, सोमवारपासून अंशत: अनलाॅक केले जात आहे. यात आता व्यापारी प्रतिष्ठाने सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
लाॅकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यासाठी पाच टप्प्यांचे निकष घोषित करण्यात आले असून, या निकषांनुसार भंडारा जिल्हा तिसऱ्या टप्प्यात येत आहे. भरलेल्या ऑक्सिजन बेडची संख्या कमी असली तरी पाॅझिटिव्हिटी रेट अधिक असल्याने जिल्हा तिसऱ्या टप्प्यात आला आहे.
भंडारा जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट ७.६७ टक्के असून ऑक्युपाइड ऑक्सिजन बेड ४.४१ टक्के आहे. ज्या ठिकाणी पाॅझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांपेक्षा कमी आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरले आहे, तेथे पहिल्या टप्प्याचे निकष लागू होणार आहेत; परंतु भंडारा जिल्ह्यात भरलेले ऑक्सिजन बेड कमी असले तरी पाॅझिटिव्हिटी रेट कमी असल्याने तो तिसऱ्या टप्प्यात लागत आहे.
अत्यावश्यक वस्तू व सेवांसह अन्य आस्थापनाही सुरू झाल्या आहेत. फक्त चित्रपटगृहे बंद राहणार आहेत. यासोबतच सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनाही ५० टक्के क्षमतेच्या आधारावर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. विवाह सोहळ्यात ५० लोकांना परवानगी असेल; परंतु शनिवार व रविवार या दिवशी कार्यक्रमांना परवानगी नसेल. तसेच मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतराचे पालन करणे आवश्यक आहे.
काय सुरू राहील?
अत्यावश्यक वस्तूअंतर्गत व सेवांबाबतची दुकाने, व्यवस्थापना, प्रतिष्ठाने रोज रविवार ते शनिवार सकाळी सात ते चार वाजेपर्यंत सुरू राहतील.
इतर (अत्यावश्यक व्यतिरिक्त) वस्तू व सेवांबाबत राहणार आहेत. मात्र यात शुक्रवारी दुपारी चार ते सोमवार सकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहील.
उपाहारगृहे, हाॅटेल, खानावळी सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील. बंदच्या दिवशी पार्सल सेवा सुरू राहील.
आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक नियमित पूर्णवेळ, सार्वजनिक बस परिवहन पूर्ण क्षमतेने सुरू राहील. कृषी दुकाने रोज सकाळी सात ते दुपारी चारपर्यंत सुरू.
व्यायामशाळा, सलून, ब्यूटी पार्लर, सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहील. उत्पादन क्षेत्र, बांधकाम, ई-काॅमर्स सेवा सुरू राहतील. शासकीय कार्यालय ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील.
सोमवारपासून अनलाॅकची प्रक्रिया सुरू झाली असली तरी जिल्हावासीयांनी त्रिसूत्री नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. याबाबतीत मी, प्रत्येकाने मास्क घालावेच असे आवाहन करीत आहे. कोविड नियमांचे पालन हे सर्वांच्याच सुदृढ आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी बाब आहे. अनलाॅक प्रक्रियेत आपल्याला अजून समोर जायचे आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी सतर्कता बाळगावी.
-संदीप कदम,
जिल्हाधिकारी, भंडारा.