वऱ्हाड्यांचा ट्रॅक्टर उलटला

By Admin | Updated: April 11, 2015 00:28 IST2015-04-11T00:28:19+5:302015-04-11T00:28:19+5:30

वऱ्हाड्यांसह गावाकडे परताणाऱ्या ट्रॅक्टरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्राली उलटली...

Parrot's tractor overturned | वऱ्हाड्यांचा ट्रॅक्टर उलटला

वऱ्हाड्यांचा ट्रॅक्टर उलटला

१५ जखमी : बोळदे सोनका गावाजवळील घटना
साकोली : वऱ्हाड्यांसह गावाकडे परताणाऱ्या ट्रॅक्टरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्राली उलटली. या अपघातात १५ वऱ्हाडी जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी बोळदे सोनका गावादरम्यान घडली. जखमींवर साकोली येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहे.
विहीरगाव येथील डेबू भोंडे याचा विवाह बकी मेंडकी जि. गोंदिया येथे सकाळी आयोजित करण्यात आला होता. विवाहासाठी वऱ्हाड्यांना ट्रॅक्टरने नेण्यात आले. विवाह आटोपल्यानंतर वऱ्हाडी त्याच ट्रॅक्टरने परत गावाकडे निघाले. दरम्यान बोळदे वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने उलटला. यात सचिन भोंडे (१५), रा. डव्या, नानू ठाकरे (५०) रा. पांढरी, कमला सूर्यवंशी (३६) रा. राका, मनोहर यावलकर (४५), तेजराम वडीकार (४०), इंदिरा राऊत (५०), उर्मिला सिंदीमेश्राम (३०),प्रेमलता नागरकर (१४) सर्व रा. विहीरगाव, वैशाली काळसर्पे (१६), अमित काळसर्पे (१०), मंदा काळसर्पे (३५) सर्व रा. किन्ही, भागरथा शहारे (५०) रा. घानोरी व राजश्री गजबे (१८) सानगडी अशी जखमीची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे तपास करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Parrot's tractor overturned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.