परमात्मा एक सेवकांत हाणामारी
By Admin | Updated: March 22, 2015 01:33 IST2015-03-22T01:33:04+5:302015-03-22T01:33:04+5:30
सिरसोली (कान्हळगांव) येथील परमात्मा एक सेवकांच्या आपसी भांडणामुळे दोन गटात हाणामारी झाली.

परमात्मा एक सेवकांत हाणामारी
आंधळगाव : सिरसोली (कान्हळगांव) येथील परमात्मा एक सेवकांच्या आपसी भांडणामुळे दोन गटात हाणामारी झाली. यात एक जखमी झाला असून त्याच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र आंधळगाव येथे उपचार सुरु आहे.
सिरसोली येथे परमात्मा एक सेवकांचे बुरडे गट व नागपूर संपर्कातील दमाहे यांच्या एक असे दोन गट आहेत. आज सकाळी ८ वाजता बुरडे गट व दमाहे गटातील सेवकांमध्ये काही कारणास्तव भांडण झाले. या दोन्ही गटातील सेवक हे एकमेकांचे सख्खे आते भाऊ व मामेभाऊ सुध्दा आहेत. मात्र सेवकांच्या काही वादग्रस्त बयानाने या दोन्ही गटात वाद झाला. हा वाद विकोपाला जावून दोन्ही गटात हानामारी झाली.
यात लता बुरडे यांच्या गटाचा महेंद्र नागपूरे हा जख्मी झाला असून त्याचा उपचार प्राथमिक आरोग्य केदं्र आंधळागाव येथे सुरु आहे. आंधळगाव पोलिस ठाण्यात दोन्ही गटानी तक्रार देवून ठाणेदार मनोज काळबांधे यांनी कलम ३२४ नूसार, दगाफसाद प्रतिबंधक कारवाई करुन दोन्ही गटातील १४ जणांना अटक करण्यात आली आहे. गावातील वातावरण शांत टिकून राहण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. (वार्ताहर)