शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

आईवडिलांची सेवा,समाजऋणात दडला देव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 10:34 PM

देव दगडात नसून, आईवडीलांची सेवा करा. त्यांचे ऋण फेडणे व समाजाची सेवा करून समाज ऋण फेडणे यातच देव दडला आहे. देवांच्या मूर्ती या भक्ताचे मन एकाग्र व्हावे म्हणून प्रतिक स्वरूप असतात, असे प्रवचन भागवतकार हभप तुलसीदास धर्माकर महाराज यांनी केले.

ठळक मुद्देतुलसीदास धर्माकर : श्री लहरीबाबा पुण्यतिथी उत्सव उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : देव दगडात नसून, आईवडीलांची सेवा करा. त्यांचे ऋण फेडणे व समाजाची सेवा करून समाज ऋण फेडणे यातच देव दडला आहे. देवांच्या मूर्ती या भक्ताचे मन एकाग्र व्हावे म्हणून प्रतिक स्वरूप असतात, असे प्रवचन भागवतकार हभप तुलसीदास धर्माकर महाराज यांनी केले.येथील संत श्री लहरीबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त तीन दिवसीय कार्यक्रमप्रसंगी प्रवचन करताना ते बोलत होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पुण्यतिथीचा उत्सव उत्साहात साजरा झाला. ८ जानेवारीला सप्तखंजरीवादक प्रबोधनकार, आकाशवानी, कीर्तनकार ११ वर्षीय तुलसीताई यशवंत हिवरे हिचे कीर्तन झाले. तिचे कीर्तन ऐकण्यास लोकांची तुफान गर्दी उसळली होती. गोपालकाल्याचे कीर्तन भुगाव पंढरपूर येथील हभप अनिल बारस्कर महाराज यांनी केले.समारोपाचा कार्यक्रम माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते यांच्या अध्यक्षतेखाली झाला. याप्रसंगी माजी खासदार नाना पटोले, प्रसिद्ध साहित्यीक डॉ. हरिश्चंद्र बोरकर, लहरी मठदेवस्थानचे अध्यक्ष पत्रकार अशोक गुप्ता, सचिव खुशाल हुकरे, सुभाष मिश्रा, गंगासागर गुप्ता, परसराम गुप्ता हे सदस्य जि.प. सदस्य नेपाल रंगारी, नगरपरिषद अध्यक्ष धनवंता राऊत, उपाध्यक्ष तरूण मल्लानी, सदस्य मनीष कापगते, मीना लांजेवार, रोहिणी गुंगूलमारे, गीता बडोले, कीर्तनकार अहिल्याताई सोनकुसरे, संत डोमा कापगते, गीता कापगते व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. प्रास्ताविक अध्यक्ष अशोक गुप्ता यांनी केले.याप्रसंगी लहरीभूषण हा पुरस्कार संत डोमा कापगते महाराज रा.उमरी यांना प्रदान करण्यात आला. मानपत्र शाल श्रीफळ व एक हजार रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लहरी लीला या सिडीचे प्रकाशन याप्रसंगी करण्यात आले. लहरीबाबांशी संबंधी भुपाळी काकडा व स्तुती आदी गीते असलेली सीडी तयार करणारे डॉ. चेतन राणे यांचा सत्कार करण्यात आला. लहरी बाबा मठासाठी विशेष कार्य करणारे नंदलाल उराडे महाराज, भरत बावनकर, बळीराम आगाशे यांचाहीसत्कार करण्यात आला. संचालन राजु दुबे यांनी केले तर आभार खुशाल हुकरे यांनी केले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. सुमारे पंधरा हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.