पानखिडकी, दिवाणघाटाची पडझड

By Admin | Updated: December 28, 2016 02:03 IST2016-12-28T02:03:55+5:302016-12-28T02:03:55+5:30

प्राचीन व ऐतिहासिक वारसा तसेच शेकडो मंदिर असलेल्या पवनी नगरातील मंदिराकडे नागरिकांनी लक्ष वेधून डागडुजी करणे सुरू केले

Pankhilde, downfall of Divanaghat | पानखिडकी, दिवाणघाटाची पडझड

पानखिडकी, दिवाणघाटाची पडझड

पवनीत ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित : निधीची वाणवा कायम
अशोक पारधी पवनी
प्राचीन व ऐतिहासिक वारसा तसेच शेकडो मंदिर असलेल्या पवनी नगरातील मंदिराकडे नागरिकांनी लक्ष वेधून डागडुजी करणे सुरू केले असले तरी ऐतिहासिक वारसा असलेले पानखिडकी व दिवाणघाट दुर्लक्षित असल्याने त्याची पडझड होत आहे. दुर्लक्षित राहिल्यास नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
‘नाव मोठे दर्शन खोटे’ या उक्तीला शोभेल अशी अवस्था या नगराची झालेली आहे. विदर्भाची काशी असा उल्लेख प्रत्येकजण करतो, परंतू ज्यामुळे काशीची उपाधी लावण्यात येते. ते स्थळ मात्र दुर्लक्षित आहेत. पुरातत्व विभाग असो की स्थानिक प्रशासन असो सर्वांचेच याकडे दुर्लक्ष आहे. प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात झाला तर पर्यटकांचे मोठ्या प्रमाणात लोंढे नगराकडे वळू शकतात, असे जाणकारांचे मत आहे. भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या प्राचीन जवाहरगेट, परकोट, हरदोलाची टेकडी, सुलेमान टेकडी, जगन्नाथ स्तुप यांचा समावेश आहे. पर्यटकांना दिसणाऱ्या स्थळापैकी जवाहरगेट, परकोट याकडे विभागाचे लक्ष आहे. त्याची डागडुजी केल्या जाते. जगन्नाथ स्तुपाचे उत्खनन बाहेर काढण्यात आलेल्या मौलिक बाबी संग्रहालयात पाठविण्यात आलेल्या आहेत. कित्येक खांब अद्याप जमिनीवर पडून आहेत.
वैनगंगा नदीचे नगराकडील तिरावर दिवाण घाट पानखिडकी, ताराबाईचा घाट, वैजेश्वर घाट अशी घाट आहेत. यापैकी एकही घाट पुरातत्व विभागाकडून संरक्षित करण्यात आलेले नाही. संरक्षित नसल्याने घाटांच्या डागडूजीसाठी शासनाच्या कोणत्याच विभागाचा निधी त्यावर खर्च होत नाही. परिणामी घाटांची झपाट्याने पडझड होवू लागली आहे. वैजेश्वर घाटावर भाविकांची वर्षभर वर्दळ राहते. वैजेश्वर घाट दुरुस्त करण्याचा प्रयत्न झाला असला तरी ऐतिहासिक महत्व असलेला दिवाणघाट व पानखिडकी यावर आतापर्यंत एक रूपयासुध्दा खर्च करण्यात आलेला नाही.
दिवाणघाट करण्यासाठी तर पानखिडकी पवनीबाहेर जाण्यासाठी खुष्कीचा मार्ग म्हणून प्रसिध्द होता. दोन्ही घाटांची दुरुस्ती केल्यास पर्यटक घाटापर्यंत जाऊन ऐतिहासिक वारसांच्या आठवणी घेऊन परततील व अन्य पर्यटकांना घाटांचे माहात्म्य कथन करुन पर्यटकांपर्यंत माहिती पोहेचेल. नगरात पर्यटकांची वर्दळ वाढली. तरच पवनीचा विकास शक्य आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासनाने प्राधान्याने ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी प्रयत्न करावा असे नगरवासीयांना वाटत आहे.

Web Title: Pankhilde, downfall of Divanaghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.