धानपीक करपले
By Admin | Updated: March 22, 2017 00:33 IST2017-03-22T00:33:00+5:302017-03-22T00:33:00+5:30
उन्हाळी धानपिकाला वेळेवर पाणी मिळत नसल्याने जगाच्या पोशिंद्यावर पुन्हा दुष्काळाचे सावट आले आहे.

धानपीक करपले
पोशिंदा संकटात : पाण्याअभावी परिस्थिती बिकट
विलास बन्सोड उसर्रा
उन्हाळी धानपिकाला वेळेवर पाणी मिळत नसल्याने जगाच्या पोशिंद्यावर पुन्हा दुष्काळाचे सावट आले आहे.
परिसरातील उसर्रा, सालई (खुर्द), टांगा, काटेबाम्हणी, सिहरी, ताडगाव, धोप टाकला आदी गावात बहुतेक शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पीक घेतली. यात हलक्या जातीचे धान लावण्यात आले असून मागील उन्हाळी धानपिकाच्या तुलनेत यंदा जास्त प्रमाणात उन्हाळी धान पीक लावले असल्याची माहिती आहे. यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतावर बोरवेल आहेत तर काही शेतकऱ्यांना बावनथडी धरणाचे पाणी मिळेल अशा आशेने धानपिक लागवड करण्यात आली.
सुरुवातीला विद्युत विभागाची कृषीपंप चालु होते. पण कालांतराने विद्युत महामंडळाकडून विजेचे भारनियमन लावण्यात आले. यासाठी शेतकऱ्यांना फक्त सहा तासांचा विद्युत पुरवठा होता. त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांचे पऱ्हे पाण्याअभावी सडते तर काहींना पुन्हा दुबार पेरणी करावी लागली. काही दिवसानंतर विद्युत विभागाकडून बारा तास विद्युत शेतकऱ्यांना सुरु करण्यात आली. पण सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने बहुतेक शेतकऱ्यांचे बोरवेलच्या पाण्याची पातळी खालावली आहे. बहुतेक बोरवेल निकामी झाल्याने शेतीला पुरेसा पाणी मिळत नसल्याने शेतातील धानपिके नष्ट होणाच्या मार्गावर असून बळीराजा चिंतातूर झाला आहे.
जीवनदायीनी बावनथडी धरण, शेतकऱ्यांचे वरदान ठरणारा असा महत्वाकांक्षी प्रकल्प काही शेतकऱ्यांनी बावनथडीचे पाणी मिळेल अशा आशेने धानपिके कापली. धरणात अजूनही पाणी शिल्लक आहे. बावनथडी धरणाचे पाणी शेतकऱ्यांना मिळाल्यास शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो. नाहीतर जगाचा पोशिंदा असलेला हा अन्नदाता पुन्हा दुष्काळाचा गदड छायेत जाण्याची शक्यता आहे. शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.