अडाणेश्वर जयंतीला कोच्छीत अवतरली पंढरी
By Admin | Updated: August 10, 2015 00:24 IST2015-08-10T00:24:52+5:302015-08-10T00:24:52+5:30
संतांची शिकवण अन् सतगुरुंचा ध्यास करी वैफल्याचा ऱ्हास, अशी अनामप्रेमींना शिकवण देत दु:खी दरिद्री जीवनात चिरंत प्रकाशज्योत तेवत ठेवणाऱ्या ...

अडाणेश्वर जयंतीला कोच्छीत अवतरली पंढरी
भक्तांची मांदियाळी : विविध कार्यक्रमांचे आयोजन, मूकबधिरांना फळांचे वाटप
बारव्हा : संतांची शिकवण अन् सतगुरुंचा ध्यास करी वैफल्याचा ऱ्हास, अशी अनामप्रेमींना शिकवण देत दु:खी दरिद्री जीवनात चिरंत प्रकाशज्योत तेवत ठेवणाऱ्या अडाणेश्वर ऊर्फ दादाजींच्या जन्मदिनी भक्तांच्या गजरात कोच्छी गाव निनादून निघाले. शनिवारी, लाखांदूर तालुक्यातील कोच्छी या छोट्याशा खेड्यात हा दादाजींच्या बारशांचा व पालखीचा सोहळा भक्तीच्या प्रेम व सद्भावनेचे अमृत शिंपडणारा होता.
यावेळी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य भक्तीचा गोतावळा अमृताचे पैजे जिंकणारा होता. दादाजींनी दु:खी, दरिद्री, लुळ्या पांगळ्या जिवांना नवसंजीवनी देत समृद्धी सुद्धा दिली. भारतातच नव्हे तर परदेशातही त्यांच्या कार्याची महती आहे. ‘अ’ चे स्वरुप कळले, ज्याशी त्याचा संबंध ओंकाराशी संबंध ओंकाराचा अडाणेश्वराशी, कालातील अनादि जो’.
अडाणेश्वर अनादि म्हणून आधी ‘अ’ शिकवेती गुरुजन याचा अडाणेश्वरजाणून, छंद 'अ' चाच पाहिजे. अनादि असे अडाणेश्वर तयाचे माध्यम महेश्वर, ब्रम्हा विष्णू महेश्वर. त्याजपासूनी प्रकटले. अशा या त्रिभूवनस्वरुपाचे जन्म ८ आॅगस्ट १९१४ ला कोच्छी येथे तोंडरे कुटुंबात झाले. दादाजींनी अमरावती येथे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतल ज्ञानार्जनासोबतच अनेक सद्गुरु लिलांचे दर्शनही घडविले. त्यांच्या महतकार्याची अनुभूती पंचक्रोशीत पसरून परप्रांतातही ठिकठिकाणी त्यांचे मंदिरे आहेत. अनामभक्त जन्मदिनापासून अनेक कार्यक्रम साजरे करतात. कार्यक्रमादरम्यान मुकबधिर विद्यार्थ्यांना लाडू भोज देवून सहकार करण्यात येतो. कोच्छी येथे पार झालेल्या सोहळ्यात शेकडो अनाम भक्तीचे सहकार्य लाभले. याप्रसंगी भक्तांसह गावकरी व समिती पदाधिकाऱ्यांनी परिश्रम करून कायग्क्रमासाठी योगदान दिले. (वार्ताहर)