पंचायत समितीच्या संगणकाचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात

By Admin | Updated: December 18, 2014 22:49 IST2014-12-18T22:49:37+5:302014-12-18T22:49:37+5:30

पंचायत समिती साकोली येथील एका विस्तार अधिकाऱ्याच्या टेबलवरून संगणक चोरीला गेल्याची तक्रार खुद्द त्याच विस्तार अधिकाऱ्याने खंडविकास अधिकाऱ्याकडे केली. प्रतिलिपी उपविभागीय

Panchayat Samiti's computer dispute reached the police station | पंचायत समितीच्या संगणकाचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात

पंचायत समितीच्या संगणकाचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात

साकोली : पंचायत समिती साकोली येथील एका विस्तार अधिकाऱ्याच्या टेबलवरून संगणक चोरीला गेल्याची तक्रार खुद्द त्याच विस्तार अधिकाऱ्याने खंडविकास अधिकाऱ्याकडे केली. प्रतिलिपी उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस स्टेशनला दिली. यावरून साकोली पोलीस या संगणकाच्या चौकशीसाठी दोन दिवसांपासून पंचायत समितीत चकरा मारताना दिसत आहेत.
साकोली पंचायत समिती येथे महिला बचत गटाचे काम पाहणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याच्या टेबलवर संगणक लावण्यात आले होते. मात्र या विस्तार अधिकाऱ्याला दि. १४ ते १९ पर्यंत स्वच्छता अभियानादरम्यान ठरविलेल्या गावात कामानिमित्त बाहेर असताना ते २० तारखेला पुन्हा पंचायत समितीच्या कार्यालयात दाखल झाले. तेव्हा त्यांच्या टेबलवरील संगणक गायब होते.
या विस्तार अधिकाऱ्याने या प्रकरणाची तक्रार खंडविकास अधिकारी यांना दिली व तक्रारीत टेबलवरील संगणक चोरीला गेल्याचे नमूद केले व याच तक्रारीची प्रतिलिपी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिली.
त्या तक्रारीची दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी पोलीस स्टेशनला सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. या आदेशावरून पोलीस पंचायत समितीत चौकशीकरिता दोन दिवसापासून येत आहेत. आधी हे प्रकरण पंचायत समितीत असल्याने त्याची खुसफूस चर्चा पंचायत समितीतच होती.
मात्र दोन दिवसापासून पोलीस कर्मचारी चौकशीला येत असल्यामुळे हे प्रकरण सर्वांनाच माहित झाले असून या प्रकरणाची माहिती पंचायत समितीतील कर्मचारी, ग्रामसेवक यांना झाली आहे.
त्यामुळे हा पंचायत समितीमधील वाद पोलिसांच्या चौकशीत काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. सध्या पंचायत समितीच्या कार्यालयात याच प्रकरणाची चर्चा सुरु आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Panchayat Samiti's computer dispute reached the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.