महाळचे चवदार तळे
By Admin | Updated: February 24, 2017 00:31 IST2017-02-24T00:31:16+5:302017-02-24T00:31:16+5:30
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने रेंगेपार कोहळी येथे आयोजित सात दिवसीय खडीगंमत

महाळचे चवदार तळे
रेंगेपार येथे खडीगंमत महोत्सव
भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने रेंगेपार कोहळी येथे आयोजित सात दिवसीय खडीगंमत महोत्सवाच्या पाचव्या दिवशी साकोली तालुक्यातील उमरझरी येथील शाहीर युवराज रामटेके व मंडळाने सादर केलेल्या डॉ. बाबासाहेबांच्या जीवनात महाळच्या तळ्याला अतिशय महत्वाचे स्थान आहे. अनेकांचा विरोध झुगारून त्याची चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा प्रसंग आमच्या लोक कलावंतानी उत्तम प्रकारे सादर केला. प्रारंभी गण गायल्यानंतर त्यांनी प्रदीर्घ गवळण प्रस्तुत केली.
सहशाहीर शैलेश रामटेके यांनी छान साथ दिली. किशोर शिंदे यांच्या ढोलकीवर हंसराज बडोले व पवन ठवकर यांनी नर्तकीचे काम करून प्रक्षकांना रिझविले. गमत्या संतोष राऊत याने हसविण्याची कामगिरी पार पाडली. सुरेश रामटेके हे क्लोट वाजविला. चोनक्या बाळा रामटेके तर टाळकरी भरत राहानडाले यांनी झिलकरी म्हणून काम सांभाळले. स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन कलावंताचा सत्कार करण्यात आला. रेंगेपार परिसरातील खेड्यांतील प्रेक्षकांनी या खडीगंमतीचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रसिद्ध शाहीर श्रीराम मेश्राम तितुर यांनी गायन करून उद्घाटन केले. या प्रसंगी वसंत खडसे व सोविंदा नंदेश्वर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शाहीर सुबोध कानेकर यांनी तर संचालन शाहीर आत्माराम बागळे यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)