पालांदूर अतिक्रमणाच्या विळख्यात
By Admin | Updated: November 4, 2014 22:36 IST2014-11-04T22:36:22+5:302014-11-04T22:36:22+5:30
गावाला निसर्गाचे लेणं लाभलेले आहे. गावाची सुंदर रचना नवख्याला मोह घालते. गाव वसाहतीच्यावेळी अभ्यासकांनी प्रत्येक गरजेकरिता वेगळी भूखंडाची व्यवस्था करुन ठेवली.

पालांदूर अतिक्रमणाच्या विळख्यात
पालांदूर : गावाला निसर्गाचे लेणं लाभलेले आहे. गावाची सुंदर रचना नवख्याला मोह घालते. गाव वसाहतीच्यावेळी अभ्यासकांनी प्रत्येक गरजेकरिता वेगळी भूखंडाची व्यवस्था करुन ठेवली. पण काही राजकारण्यांनी गावाची शान, प्रगती धोक्यात आणली. स्मशानभूमी खातकुडा, बाजारपेठेचा मुख्य रस्ता, बाजार, गवती जमीन, कोंडवाडा अतिक्रमणाच्या विळख्यात आल्याने पालांदूर विकासात मागे पडला आहे.
अवाजवी अतिक्रमणाने होत्याचे नव्हते झाले. गाव विकासाकरिता धडपडणारा गावनेता काळाच्या ओघात हरविल्याने वाटेल तेवढी व मिळेल तिथे गावाची जमीन हस्तगत केली. साडे आठ एकराची स्मशानभूमी केवळ चार - पाच एकर उरली. दोन एकराचे खातकुडा आज शून्य आहे. ७० डिसमिल बाजाराची जागा व याला जोडूनच गवती कुरण असलेल्या जागेत सिमेंटची घरे वसलेली आहेत. याच बाजारात ग्रामपंचायती व्यापारी चाळ अतिक्रमणातच बांधली आहे. गावाच्या मध्यभागातून बसस्थानकापासून सुमारे दोन कि.मी. चा रूं द असलेला रस्ता व्यापाऱ्यांनी नालीबाहेर व नालीवरही अतिक्रमण करू न रहदारीकरिता मोठी अडचण तयार आहे. ग्राहकांच्या दुचाकीचा व्यापाऱ्यांच्या मालवाहक वाहने रस्त्यावरच उभ्या असल्याने पादचाऱ्यांना ये-जा करिता मोठी अडचण होत आहे. आबादीचे भुखंड गरज नसलेल्यांना वाटप करण्यात आले. त्यांनी एक ते दोन लक्ष रू पयात विकली. ग्रामपंचायत ताठर भुमिका घेत नसल्याने प्रशासनही गुडघे टेकून शांत आहे. (वार्ताहर)