रंगविलेल्या भाज्यांची बाजारात विक्री

By Admin | Updated: June 8, 2014 23:43 IST2014-06-08T23:43:41+5:302014-06-08T23:43:41+5:30

रंग हे जीवनात आनंद भरतात, परंतु हेच रंग भाज्यांमध्ये वापरले तर ते मनुष्यासाठी हानीकारक ठरू शकतात. भाज्यांना कृत्रिम रंग चढवून त्यांना विक्री करण्यासाठी भंडाराच्या बाजारात आणल्या जात आहे.

Painted vegetable market sales | रंगविलेल्या भाज्यांची बाजारात विक्री

रंगविलेल्या भाज्यांची बाजारात विक्री

भंडारा : रंग हे जीवनात आनंद भरतात, परंतु हेच रंग भाज्यांमध्ये वापरले तर ते मनुष्यासाठी हानीकारक ठरू शकतात. भाज्यांना कृत्रिम रंग चढवून त्यांना विक्री करण्यासाठी भंडाराच्या बाजारात आणल्या जात आहे. मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे, परंतु या प्रकाराकडे कुणाचेही लक्ष नसल्याने ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आले  आहे.
उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पाण्याच्या कमतरतेमुळे  भाजीपाला पिकांचा तुटवडा जाणवत आहे. यातूनच भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडलेले आहेत. असे असले तरी ग्राहक पिकलेले किंवा पिवळय़ा रंगाचा भाजीपाला खरेदी करीत नाही. हे कारण ओळखून भाजी विक्रेत्यांनी काटवल व कारले या दोन भाज्यांना हिरवा रंग चढवून त्या भाज्या विकणे सुरू केले आहे. हवामानाच्या बदलामुळे काटवल व कारल्यांचा रंग पिवळा पडतो. पिवळसर भाज्या ग्राहक खरेदी करीत नाहीत. या भाज्यांकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पोत्यांना लावण्यात येणारा रंग भाजीपाल्यांना लावण्यात येत आहे.
भंडार्‍याच्या बाजारात येणारी काटवल छिंदवाडा येथून येत आहेत. तेथील घाऊक विक्रेता या काटवलाबरोबर भाजी विक्रेत्यांना हिरव्या रंगाचे पाकीटही पुरवितात, असे एका भाजी विक्रेत्या महिलेने सांगितले. मागील काही दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे, परंतु याकडे कुणाचेही लक्ष गेलेले नाही.
बाजारातील या अफलातून प्रकाराकडे ग्राहक संघटना, अन्न व औषध प्रशासन विभाग किंवा आरोग्य विभागाचेही लक्ष नाही. बाजारातील गर्दीमुळे त्या भाज्यांना चढविलेला रंग ओळखणे खरेदीदारांना ओळखणे कठीण जाते. ४५ रुपये प्रतिकिलो दराने रंग चढविलेले काटवल व कारले विक्री होत आहेत. मात्र या रंगमि२िँं१्रूँं१त भाजीची चव कडवट लागते.
रंग दोन प्रकारचे असतात. एक रंग खाण्यायोग्य तर दुसरा खाण्यासाठी अयोग्य असतो. खाण्यासाठी अयोग्य असा रंग मानवाच्या शरीरात गेल्यास अनेक विकार होण्याची दाट शक्यता असते. त्या रंगाची परिणामकारकता अधिक असून ते जास्त काळ टिकून राहतात, असे वैद्यकीय अधिकार्‍याने सांगितले. त्यामुळे या प्रकाराला वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. ग्राहकांना भाजीपाला हिरवागार दिसावा यासाठी काही भाजी विक्रेत्यांनी आपली शक्कल लढविली आहे. हिरव्यागार दिसणार्‍या भाज्यांकडे प्रत्येक ग्राहकाचे लक्ष जाते. मात्र रंगचढवून बाजारात विक्री होणार्‍या भाज्या आरोग्यासाठी हानीकारक आहेत. (नगर प्रतिनिधी)
 

Web Title: Painted vegetable market sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.