बांधकाम साहित्याचे कीट घेण्यासाठी तीन दिवसांपासून पावसात तिष्ठत असलेल्या कामगारांकरिता शिवसैनिकांनी सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना येथे गुरुवारी (दि. ४) रोजी सकाळी ११ च्या सुमारास घडली. ...
शिकार केलेल्या रानडुकराचे मांस विकलेल्या पैशावरून झालेल्या वादात वाघाच्या शिकारीचे बिंग फुटले असून आंतरराज्यीय शिकाऱ्यांची टोळी आयतीच वनविभागाच्या हाती लागली. हा वाद झाला नसता तर तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथे झालेल्या वाघाची शिकारही पुढे आली नसती ...
गत तीन चार दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे मोहाडी तालुक्यातील नवेगाव येथील एक घर कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र एक कुटुंब उघड्यावर आले आहे. ...
जिल्ह्यात ३३ दिवसात २०१.५ मिमी पावसाची नोंद झाली असली तरी खरा पाऊस हा गत आठवड्यातीलच आहे. तब्बल महिनाभराच्या दडीनंतर पावसाचे आगमन झाले असून गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळत आहे. यामुळे बळीराजा सुखावला असून रोवणीच्या कामाला वेग आला आहे. ...
मंगळवारी रात्रीपासून सततच्या पडत असलेल्या मुसळधार पावसाने तुमसर-रामटेक राज्य मार्गावरील काटेबाम्हणी-उसर्रा रस्त्यावर असलेल्या पुलाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली असून सदर राज्यमार्ग बंद आहे. ...
गत पाच दिवसांपासून संततधार पावसामुळे करडी परिसरातील नाल्यांना पूर आला आहे. वैनगंगा नदी, तलाव व विहिरींच्या पाण्याच्या पातळीत चांगलीच वाढ झाली. मात्र, पेरणीच्या हंगामातच अतिवृष्टी झाल्याने परे पाण्याखाली येवून सडण्याची भीती निर्माण झाली आहे तर शेतशिवा ...
'सबका साथ सबका विकास' अशी घोषणा असताना शासनाचीे पुन्हा शेतकऱ्यांविषयी उदासीनता दिसून येत आहेत. धान हमी केंद्रावर धान विकून ४५ दिवसांचा कालावधी लोटला असताना देखील आता खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना चुकारे न मिळाल्याने शेतकरी खरीपाच्या तोंडावर संकटात साप ...
स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत जिल्हा कार्यालय आणि डॉ.हेडगेवार रक्तपेढीच्या वतीने मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन येथील बचपन अ प्ले स्कुल येथे करण्यात आले होते. यावेळी रक् ...
सासुरवाडीला गेलेल्या किराणा व्यवसायीकाचे घर फोडून चोरट्यांनी १४ तोळे सोने आणि ३० तोळे चांदी असा चार लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना येथील सुभाष वॉर्डात घडली. ...
चार वर्षांपासून घरकुलासाठी ग्रामपंचायतीचे उंबरठे झिजवूनही घरकुल तर मिळाले नाही उलट गत तीन दिवसांपासून सुरु असलेल्या धो-धो पावसात राहते घरच कोसळले. यामुळे लाखांदूर तालुक्यातील ढोलसर येथील चौधरी परिवारावर उघड्यावर राहण्याची वेळ आली. विशेष म्हणजे भिंत क ...