अड्याळ परिसरात पावसाने दडी मारल्याने पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांची स्थिती आजघडीला बिकट झाली आहे. येत्या काही दिवसात पिकांना पाणी नाही मिळाले तर दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे. ...
पावसाचे दिवस असल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जोमाने कामास लागावे, तसेच शेतकऱ्यांचे प्रलंबित पंचनामे निकाली काढावे, असे निर्देश फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिले. ...
सुमारे ५० वर्ष राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता खराब होणार नाही. अशी ग्वाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली होती. परंतु तुमसर गोंदिया राष्ट्रीय महामार्गाच्या तुडका शिवारातील सिमेंट रस्त्याला उद्घाटनापूर्वीच तडे गेले आहे. ...
जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या वैनगंगा नदीचे पाणी नागनदीच्या सांडपाणी व जलजन्य वनस्पतींमुळे दिवसेंदिवस दूषित होत आहे. त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. आता नदीच्या स्वच्छतेसाठी कोण पुढाकार घेणार असा सवाल उपस्थित होत आहे. ...
शहरातील मुख्य रस्त्यांवर व प्रमुख चौकात बेशिस्तपणे रस्त्यावर वाहने उभे केली जात असल्यामुळे सातत्याने वाहतुक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे दरवर्षी अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबवूनही वाहतूकीची समस्या सुटलेली नाही. ...
राष्ट्रीय महामार्गावर दारुची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाला अडवून लाखनी पोलिसांनी कारवाई केली. यात एक लाख ४१ हजारांची दारू जप्त करण्यात आली. महामार्गावरुन विदेशी दारुची अवैध वाहतुक होणार असल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मंडलवार यांनी सहकार्यासोबत ...
भंडारावासीयांची जीवनदायिनी असलेल्या वैनगंगा नदीवर ईकॉर्निया या जलपर्णी वनस्पतीने विळखा घातला असून सद्यस्थितीत वैनगंगेला हिरव्या लॉनचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या वैनगंगेच्या पाण्यावर ईकॉर्निया जलपर्णी वनस्पती पसरली असून यामुळेही पाणी दूषित होत आहे. ...
पावसाळ्याचे दिवस असूनही उष्णतेत वाढ होत असल्याने पुन्हा शासकीय निमशासकीय कार्यालयात तर, काही घराघरामध्ये पंखे, कुलरची घरघर सुरू झाली आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे महागडे बि-बियाण्याची शेतात पेरणी केली. ...
तीन वाघ आणि दोन बिबट्यांच्या शिकारीचे प्रकरण उघडकीस येऊन दोन आठवडे उलटले तरी मोरक्या मात्र वनविभागाचा हाती लागला नाही. मध्यप्रदेशात आठवडाभर तळ ठोकून असलेले पथकही रिकाम्या हाताने परतले. स्थानिक शिकाऱ्यांना अटक केल्यानंतर या प्रकरणाचा तपास संथगतीने सुर ...
झाडाच्या मुळांना कलात्मक दृष्टीने आकार देत काष्ठशिल्प घडविण्याचे काम ग्रामीण भागता राहणाऱ्या एका कलावंताकडून होत आहे. त्याचे काष्ठशिल्प कौतुकाचा विषय ठरत असून आपल्या सृजनशीलतेला आयाम देण्यासाठी हा ग्रामीण लोहार समाजाचा कलावंत कलेच्या क्षेत्रात आपले द ...