तुमसर नगर पालिकेच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न डॉ.पंकज कारेमोरे यांचा होता. त्यामुळेच त्यांनी सदर जागेवर झाडे लावली होती. नगर पालिकेने ती झाडे अन्यत्र हलवून तिथे संरक्षकभिंत बांधण्याचे काम सुरु केले आहे. ...
पर्यायी व्यवस्था न करता सातत्याने अतिक्रमण धारकांची फुटपाथवरील दुकाने उचलून नेली जात आहे. या अन्यायाविरूद्ध दाद मागण्यासाठी संतप्त झालेल्या अतिक्रमण धारकांनी गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास गांधी चौकातील पालिका कार्यालयाला घेराव घातला. ...
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी भंडारा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.पी. पांडे यांनी एका २२ वर्षीय तरूणाला १३ वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. ...
भाजपचे आमदार चरण वाघमारे आणि माजी आमदार सुभाषचंद्र कारेमोरे यांचा मुलगा अस्थी विकारतज्ञ डॉ. पंकज कारेमोरे यांच्यात वाद होऊन झालेल्या मारहाणप्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉ. कारेमोरे यांना तुमसर न्यायालयाने गुरूवारी जामीन मंजूर केला. ...
भाजप सरकारने वारंवार पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये दरवाढ करून जनतेची फसवणूक सुरू असल्याचा असा आरोप करून त्या निषेधार्थ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने संयुक्त बैलबंडी मोर्चा बुधवारला दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. ...
मुख्यमंत्र्यांच्या सभेची पूर्वतयारी पाहण्याकरिता गेलेले आ.चरण वाघमारे यांना डॉ.पंकज कारेमोरे यांनी शाब्दीक वाद घालून धक्काबुक्की केली. यावेळी एका नगरसेवकालाही मारहाण केली. ...
कोरंभी देवी येथे माता पिंगलेश्वरी देवस्थान परिसरात जिल्हा कक्ष, ग्रामपंचायत व महिला बचत गटांच्या वतीने स्वच्छता व प्लास्टीक गोळा करून भाविक व पर्यटकांमध्ये प्लास्टीक बंदी व शाश्वत स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्याचा संदेश देण्यात आला. ...
जेवनाळा नाल्यातील गौण खनिजात रेती व खडकाचे विनापरवाना अवैधपणे खनन करून त्याची वाहतूक करण्यात येत आहे. नाल्याच्या काठावरील शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. ...
एरवी पावसाळ्यात गढूळ तथा दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होतो. मात्र उन्हाळ्याच्या दिवसात ही जंतुयुक्त व दूषित पाणीपुरवठ्याने अड्याळवासी त्रस्त झाले आहेत. अशावेळी ग्रामस्थांनी पाणी विकत घेऊन प्यायचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे. ...