लोकसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा सातत्याने पराभव होत असल्यामुळे राज्यातील भंडारा आणि पालघर या दोन लोकसभा क्षेत्राच्या पोटनिवडणुका जाहीर करण्यात विलंब करण्यात येत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले यांनी केला आहे. ...
जिल्हयात जलजागृती सप्ताहाचे आयोजन १६ ते २२ मार्च या कालावधीत करण्यात आले आहे. या सप्ताहाचा शुभारंभ आज भंडाराचे नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांच्या हस्ते जलपूजन करुन करण्यात आला. ...
नागरिकांच्या मनात भीती निर्माण करणे हे पोलिसांचे कार्य नाही तर पोलिसांप्रती ग्रामस्थांच्या मनात आपलेपणाची भावना निर्माण करणे हेच पोलिसांचे कर्तव्य आहे आणि शासनाला सुद्धा हेच अपेक्षित आहे. ...
सद्यस्थितीत दहावी परीक्षांचे सत्र सुरु आहे. परीक्षा घेण्याचा ताण, उत्तरपत्रिकांचे गठ्ठे विहित मुदतीत तपासून समिक्षकांकडे देणे, शिक्षण विभागाकडून माहिती मागविण्याचा सपाटा आणि अवेळी घेण्यात येणारे प्रशिक्षण या साऱ्या बाबींचा ताण मुख्याध्यापकांवर आहे. ...
तुमसर- वाराशिवनी या राज्य मार्गावरील खैरलांजी गावाजवळ पुलावरुन ट्रक खाली कोसळला. सुदैवाने जिवीत हानी टळली. हा अपघात बुधवारी घडला. या पुलाचे आयुष्य संपले असूनही त्या पुलावरुन वाहतुक सुरुच आहे. ...
शिष्यवृत्ती ही आम्हाला मिळणारी भिक नसून आमच्या हक्काची आहे, असा ध्येयवाद बाळगून सम्यक विद्यार्थी आंदोलनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी धडक मोर्चा काढण्यात आला. ...
जिल्ह्यातील लाखांदूर वनपरिक्षेत्र अंतर्गत दांडेगाव जंगल परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. दांडेगाव येथील प्रभाकर कचरू बुरडे यांच्या मालकीचा बैल तर ईश्वर सयाम यांच्या मालकीच्या शेळीवर हल्ला करून ठार केले. ही घटना मंगळवारला रात्रीच्या सुमारास घडली. ...