कोट्यवधी रूपये खर्चून वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेला पूल वारंवार क्षतिग्रस्त होत असल्यामुळे या पुलावर दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगाच रांगा दिसत आहेत. या फटका वाहनचालकांना होत आहे. ...
सरकारच्या ओबीसी व शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करीत शेतकरी संपाला पाठिंबा दर्शवित रविवारला सकाळी करडी परिसरातील शेतकऱ्यांनी देव्हाडा व नरसिंगटोला मार्गावर दूध, भाजीपाला, टरबूज, काकडी व धान्य फेकून असंतोष व्यक्त केला. ...
मागील ६० वर्षे महाराष्ट्र सरकारने विदर्भाच्या हिस्याच्या नोकऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील युवकांना दिल्या. आता मुख्यमंत्र्यांनी ७२ हजार सरकारी नोकऱ्या जाहीर केल्या असून या संपूर्ण नोकऱ्यांवर विदर्भातील बेरोजगार तरूण तरूणींचा अधिकार आहे. त्या विदर्भाला म ...
घरातील वातावरण आल्हाददायक, मनाला प्रफुल्लीत करणारे असेल तर कर्तव्यसुद्धा तेवढेच आनंदाने व जोमाने पार पाडू शकतो. मात्र घरचे वातावरणच जर त्रासदायक असेल तर काम करताना साहजीकच चिडचिड निर्माण होवून कर्तव्य निटपणे पार पाडू शकणार नाही. मोहाडी पोलीस ठाण्याच् ...
शासनस्तरावरील आदेशान्वये नगर परीषदच्या अंतर्गत येत असलेल्या अपंगांना तीन टक्के निधी वाटप करण्यासंदर्भात न.प. च्या पदाधिकारी अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी दिलेल्या उत्तराच्या विरोधात प्रहार संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात ...
येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापना दिवस १० जून रोजी उत्साहात साजरा करून नवनिर्वाचित खासदार मधुकर कुकडे यांचा सत्कार करण्यात आला. सर्वप्रथम सकाळी १०.१० मिनिटांनी राकाँ प्रदेशाध्यक्ष धनंजय दलाल यांच्या ह ...
नागपूर-रायपूर रेल्वे मार्गावर महत्वाच्या ठिकाणी असलेल्या गोंदिया रेल्वे स्थानकावर पुरी-इंदोर-पुरी या साप्ताहिक रेल्वे गाडीचा थांबा देण्याची मागणी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य नानू मुदलीयार यांनी केली आहे. ...
चान्ना-कोडका ते पांढरवाणी रस्त्याची फारच दुर्दशा झाली आहे. चार-पाच वर्षांपूर्वी या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले होते. आता रस्त्यावरील गिट्टी जागोजागी उखडल्यामुळे हा रस्ता अपघाताला आमंत्रण देणारा ठरत आहे. ...
सिहोरा गावात शनिवारच्या पहाटे ३ वाजेच्या सुमारास एका गोठ्याला आग लागली. त्यानंतर लोकांच्या ओरडण्याचा आवाज सुरू झाला आणि गावकरी जागे झाले. आणि पाहिले तर काय चार घरांना भीषण आगीने कवेत घेतले होते. ...
शुक्रवारी रात्रीपासून रिमझीम सुरू झालेला पाऊस शनिवारी सकाळी ८ वाजतापासून धो-धो बरसला. दुपारच्या सुमारास चांगले ऊन्ह तापले आणि सायंकाळी ६ वाजतापासून विजांच्या कडकडाटात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले होते. ...