जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णाने आजाराला कंटाळून वैनगंगा नदीत उडी घेतली. मात्र त्या ठिकाणी पोहण्याचा सराव करणाऱ्या तरूणाने त्याला पाण्यातून सुरक्षित बाहेर काढून जीवदान दिले. ...
रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस पथकावर जीवघेणा हल्ला करुन गत महिनाभरापासून पसार असलेल्या मुख्य आरोपीसह सहा रेती तस्करांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सोमवारी यश आले. मोहाडी पोलिसांच्या आरोपी ताब्यात असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात ...
तझ अभियंत्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराद्वारे स्वत:च्या व पर्यायाने समाजाच्या विकासाची दालने उघडावी. शासनाचे विविध विभाग नवउद्योजकांना मदत करण्यासाठी तत्पर आहेत त्यांची मदत घेवून स्वयंरोजगाराद्वारे इतरांनाही रोजगाराचा पुरवठा करावा, अ ...
प्रचंड मेहनत व सत्याच्या मार्गावर असलेल्या व्यक्तींच्या जीवनात कितीही अडचणी आल्या तरी त्या डगमगत नाही. संघर्ष व चिकाटी ही दोन गुण आत्मसात करून संघर्षमय मार्गाने यश खेचून आणण्याचे अनन्यसाधारण काम ती व्यक्ती करीत असते. ...
रात्री आपल्या आईसोबत झोपलेल्या एका पाच वर्षीय बालकाला झोपेतच सापाने दंश केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना लाखांदूर तालुक्याच्या सोनी चप्राड येथे रविवारी रात्री घडली. ...
जिल्ह्यासह विदर्भात फवारणीच्या विषबाधेने अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला तर शेकडो शेतकऱ्यांना विषबाधा झाली. गत काही वर्षापासून विषबाधेच्या प्रकारात वाढ झाल्याने शेतकºयांसोबतच मजुरही हादले आहे. शेतात फवारणी करण्यासाठी मजुर मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थिती ...
मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर असलेल्या भंडारा येथे रॅक पॉर्इंट नसल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना वाहतुकीसाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. भंडारा येथे रॅक पॉर्इंट द्यावा, या मागणीसाठी गत अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे. रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्तावही ...
पवनी शहर व ग्रामीण परिसरात डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळले आहेत. साथ झपाट्याने पसरत असल्याने काँग्रेस कमेटीच्या कार्यकर्त्यांनी वेळवा गावातील रुग्णांना भेट देवून माहिती घेतली. रुग्णांना नागपूर किंवा भंडारा येथे जावून उपचार घ्यावा लागत आहे. ...
बावनथडी नदीचे काठावर असणाऱ्या सोंड्या गावाचे शेजारील घनदाट जंगलात वाघाने बस्तान मांडले आहे. या वाघाचे हल्ल्यात गाय ठार झाली असून गावात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. ही घटना रविवारला सकाळच्या सुमारास घडली. ...
बाजारात नावारुपास आलेल्या ब्रँडची नक्कल करून त्याच किमतीत लोकल ब्रँड विकण्याचा गोरखधंदा गत काही वर्षांपासून सुरू आहे. हा प्रकार सर्वाधिक मिनरल वॉटरमध्ये दिसत असून एमआरपी दडवून ब्रँडेड कंपन्यांच्या दरात विक्री केली जाते. ...