विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रासमोरील धान पोती नळाच्या पाण्यांनी तसेच मोकाट जनावरांच्या नासधुसमुळे तुमसर तालुक्यातील बघेडा येथील शेतकरी प्रकाश दुर्गे यांच्या धानपोतींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भी ...
लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीने दोन वर्षापूर्वी नऊ रोजंदारी मजुरांना कामावरून कमी केले. न्यायालयाच्या आदेशानंतर बाजार समितीने काम उपलब्ध झाल्यावर मजुरांना कामावर घेण्याचे आश्वासन दिल्यानंतरही मजुरांना कामावर घेतले नाही. उलट दुसऱ्याच मजुरांना कामावर ...
तीन निष्पाप महिलांचा बळी घेणाऱ्या राजापूर-नाकाडोंगरी मार्गावरील यू-टर्नवरील वाढलेल्या झाडाझुडपांकडे चार दिवसानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. तीन महि ...
तालुक्यातील पालोरा परिसर हा चौरास भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय आहेत. मात्र कमी वेळात जास्त पैसे कमावण्याच्या नादात शेतकऱ्यांसह व्यापारीसुध्दा दुधात वेगवेगळे पदार्थ भेसळ करुन विक्री करीत आहेत. ...
लाखनी येथे जेएमसी कंपनीमार्फत सार्वजनिक मारोती देवस्थानची गुजरी चौकातील दहा एकर कृषक जागा बळकाविल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी भजनदिंडी आंदोलन करण्यात आले. मंदिर ते तहसीलकार्यालयापर्यंत ही दिंडी काढण्यात आली होती. दरम्यान तहसीलदार यांना निवेदन देऊन आंद ...
पर्यटन विकासासाठी महत्वाचा ठरणाऱ्या कोरंभी-बेला रस्त्याला शासनाने मंजूरी दिली असून आता हा रस्ता बांधकामाच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. ...
भंडारा जिल्ह्यातील युवकांनी पुढाकार घेऊन विविध राज्यातील कलावंतांना घेऊन तयार केलेला 'हौसला और रास्ते' या लघुचित्रपटाची दिल्ली येथे होऊ घातलेल्या सातव्या दिल्ली आंतरराष्ट्रीय लघु-चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली असून २८ आॅक्टोबरला त्याचे प्रदर्शन होणार ...
तलावाची पाळ फुटून सिंदपूरी गावात पाणी शिरले होते. सुमारे चार वर्षापासून बेघराला घरकुलाचा लाभ मिळाला नाही. त्या विरोधात अन्यायग्रस्ताने सिंदपुरी ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरु केले होते. सदर उपोषणाची दखल जि.प. सदस्या प्रतीक्षा कटरे यांनी तात्काळ घेत ...
महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजना दिघोरीत उत्कृष्ठपणे राबविल्यामुळे ही योजना दिघोरीवासीयांसाठी वरदान ठरलेली आहे. जलयुक्त शिवार योजनेत दिघोरीमध्ये सात विहिरींना पुनर्भरणाची सोय करण्यात आली. ...
गत चार वर्षात भाजप सरकारने शेतकऱ्यांना फक्त आश्वासन दिले पण वास्तविकतेमध्ये काम करताना या सरकारने शेतकऱ्यांची पूर्णपणे दिशाभूल केलेली आहे. दिलेले आश्वासन हवेतच विसरून गेले आहेत. ...