अपूऱ्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळ निर्माण झाला आहे. हजारो हेक्टरवरील धान पीक नष्ट झाले आहे. त्यानंतरही शासनाने दुष्काळग्रस्तांच्या यादीतून भंडारा जिल्ह्याचे नाव वगळले आहे. संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा. ...
सामाजिक दायीत्वाचा परिचय देत बँक आॅफ इंडियाने मोहाडी येथील नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ४० डबल डेकर बेड दिले. यामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवास करणे सोयीचे होणार आहे. ...
तिकिटांच्या आॅनलाईन आरक्षणामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण होत असल्याची विचित्र परिस्थीती तुमसर बस आगारात पहावयास मिळत आहे. एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास या ब्रीद वाक्याची सार्थकता म्हणून महाराष्ट्र परिवहन मंडळाने शिवशाही ही खास बस सेवा सुरु केली आहे. ...
रेती वाहतुकीतील अवजड आणि ओव्हरलोड वाहनांमुळे बांधकाम विभागाच्या रस्त्याची पूर्ती वाट लागली आहे. रेतीघाटालगतच्या गावातील रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे. याचा नाहक भुर्दंड बांधकाम विभागाला बसत असून महसूल आणि परिवहन विभाग मात्र अशा वाहन धारकांवर कोणत ...
तरुण अभियंत्याचा झालेला अपघाती मृत्यू संपूर्ण तुमसर वासीयांना चटका लावून गेला. कोका अभयारण्यातील सहल आटोपून गावी परतताना त्यावर काळाने घाला घातला. या घटनेने संपूर्ण तुमसर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. ...
आम आदमी की सरकार म्हणत ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या केंद्र सरकारने सामान्य नागरिकांना महागाईच्या कचाट्यात ढकलले आहे. सामान्यांकरिता ‘उज्ज्वला’च्या पुढाकारातून घरोघरी गॅस पोहोचला. पण गॅसचा भडका एवढा भयावह झाला की सामान्यांना न परवडणारा झाल्याने ग् ...
देव्हाडी बायपास दरम्यान न्यायपालिका मार्गावर गती नियंत्रक व हॉर्न प्रतिबंधीत फलकाचा अभाव असल्याचे दिसुन आले आहे. वाहतुक अधिनियमानुसार निवडक क्षेत्रादरम्यान मोडणा-या मार्गावर प्रतिबंधीत फलक लावण्यात येतात. त्यात न्यायपालिकेसमोरील मार्गावर हॉर्नचा वापर ...
दक्षिण पूर्ण रेल्वेची ५३२ क्रमांकाची फाटक रविवारी सायंकाळी ६ ते ६.३० पर्यंत बंद होती. त्यामुळे तुमसर-गोंदिया राज्य मार्गावर वाहनांच्या सुमारे एक ते दीड कि.मी. रांगा लागल्या होत्या. फाटक उघडल्यानंतर वाहतूकीची प्रचंड कोंडी झाली होती. ...
दिवाळी सण आणि त्यानिमित्ताने आलेल्या सलग सुट्यांमुळे ग्रामीण भागातील एटीएम कॅशलेस झाले आहेत. पैशासाठी शहरात धाव घेवून पैसे काढण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. सणासुदीच्या काळात बाहेरगावी आलेल्यांची तर एटीएम कॅशलेस असल्याने चांगलीच पंचाईत होत आहे. हाता ...