पाणी हे जीवन आहे. याचा समृद्ध साठा जिथे असतो तिथे वैभवसंपन्नता असते असे म्हटले जाते. मात्र भंडारा या बाबतीत अपवाद ठरत आहे. दात आहेत पण चणे नाही, अशी स्थिती पाणीपुरवठ्याच्या बाबतीत झाली आहे. ...
राफेल घोटाळा हा आतापर्यंतचा भारतातील सर्वात मोठा रक्षा घोटाळा आहे. या प्रकरणात केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयालाही अंधारात ठेवले आहे. या प्रकरणी सत्य व असत्य बाबी समोर येण्यासाठी संयुक्त संसदीय समितीत (जेपीसी) चर्चा करण्याची नितांत गरज आहे. ...
आदिवासी विकास विभागाला शासनाने स्वतंत्र व मोठे बजेट दिले असून या निधीचा उपयोग आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी करण्यात यावा. विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी आदिवासी विभागाच्या सर्व शाळा डिजीटल करण्यात या ...
महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी शासन सदैव तत्पर असून महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी निर्माण करुन देण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या आहेत. महिला बचत गटांनी बांबु लागवडीसाठी पुढाकार घ्यावा, जिल्हा प्रशासन जमीन उपलब्ध करुन देईल. ...
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील भरधाव वाहतुकीमुळे विविध समस्या निर्माण झाल्या असून या समस्या सोडविण्यासाठी लवकरच या महामार्गाचे विस्तारीकरण केले जाणार आहे. त्यासाठी ८७ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. ...
रेल्वेच्या भरारी पथकाने तुमसर रोड रेल्वे स्थानकावर शुक्रवारी शंभर प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करून ५० हजार रूपये वसूल केले. सदर कारवाई रेल्वे न्यायाधीशांच्या उपस्थितीत करण्यात आली. या कारवाईने रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली. ...
जीवनदायी वैनगंगेच्या नदीपात्रात तोंडेश्वर येथे निसर्गरम्य बेट आहे. पर्यटनाच्या दृष्टीने आदर्श असलेले हे बेट मात्र विकासापासून कोसो दूर आहे. लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेने या बेटाचा विकासच झाला नाही. ...
देशातील प्रत्येक नागरिकाला २०२२ पर्यंत हक्काचे घर देण्याचा शासकीय स्तरावर गाजावाजा केला जात आहे. मात्र लाखांदूर तालुक्यातील घरकुलाचे अनेक लाभार्थी प्रशासनाचे उंबरठे झिजवित आहे. मात्र अद्यापही त्यांना हक्काचे घर मिळाले नाही. प्रशासनाचे उंबरठे झिजवून आ ...