जिल्ह्यातील एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नसताना मध्यप्रदेशातील रॉयल्टीच्या आधारे मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन सुरु आहे. यातून महाराष्ट्र शासनाच्या महसुलाला लाखोंचा चुना लागत असून लिलावापूर्वीच घाटात दररोज मशीनद्वारे उत्खनन करून ट्रकद्वारे वाहतू ...
धकाधकीच्या काळात प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तणावात असतो. अशावेळी सुसंवाद असल्यास त्यातून सकारात्मक उर्जा मिळते. चांगले आणि गोड बोलण्यातून आपल्या कार्यक्षेत्रात व कुटुंबातही पोषक वातावरण निर्मिती होते, असे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवीं ...
सिंचनाच्या मुख्य उद्देशाने बांधण्यात आलेल्या पेंच प्रकल्पाचे पाणी नागपूर शहरासाठी राखीव ठेवले. परिणामी लाभक्षेत्रातील ७० गावातील नागरिकांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. आता आम्हाला पेंच प्रकल्पाचे पाणी नको, उपसा सिंचन योजना द्या अशी मागणी या भागातील ...
तुमसर व मोहाडी तालुक्यातील शिवारात राष्ट्रीय महामार्गात मुरूमाच्या भरावाकरिता महसूल प्रशासनाने पुन्हा जांब कांद्री येथील गटक्रमांक ६६९/१ येथून लीज मंजूर करण्यात आली. सदर गटात भूगर्भातून पाणी लागेपर्यंत मुरूमाचे उत्खनन करण्यात येत आहे. रस्त्यावर मुरूम ...
देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपूल बांधकामात रिकाम्या पोकळीत पॅकींगकरिता लाकडी गिट्टीचा आधार देण्यात आला आहे. हजारो टनाचे वजन एक लाकडी गिट्टी सहन करीत आहे. हा कुतुहलाचा विषय आहे. पॅकींग केल्यावरही पावसाळ्यात पोकळीतून पाण्यासह फ्लाय अॅश रस्त्यावर आली हो ...
अपुऱ्या पावसाचा फटका जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना बसला असून पाटबंधारे विभागाच्या अखत्यारितील ६३ प्रकल्पांमधील केवळ २२.१८ टक्के जलसाठा आहे. सिंचनाची भिस्त असलेल्या जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पात ८.१० दलघमी जलसाठा असल्याची उन्हाळी पिकांना प्रकल्पाचे ...
कुठल्याही क्षेत्रात आपण काम करीत असतांना सकारात्मक विचार ठेवून आणि मनापासून काम केले तर त्याचा निश्चितच फायदा होतो. फळ चांगले हवे असेल तर कामही चांगले करावे लागते, असे जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांनी सांगितले. ...
प्रेमप्रकरणाच्या संशयातून एका तरूणाचा टी-शर्टने गळा आवळून खून करणाऱ्या तीन आरोपींना साकोली पोलिसांनी अवघ्या २४ तासात अटक केली. तालुक्यातील किन्ही येथे शनिवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. ...
लग्न जुळल्यानंतर भावी आयुष्याचे स्वप्न रंगविणाऱ्या एका पोस्टमन तरूणीला भरधाव ट्रकने जागीच ठार केले. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर भंडारा शहरात रविवारी सायंकाळी घडली. फेब्रुवारी महिन्यात आयोजित साक्षगंधाच्या तयारीला असलेल्या परिवाराला अंतयात्रेची तयार ...
जिल्हा काँग्रेस असंघटीत कामगार कमिटीच्या वतीने विविध मागण्यांसाठी सोमवारी येथील जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. यात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. पथविक्रेता समितीचे गठन करण्यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. ...