भंडारा तालुक्यातील खुर्शीपार येथे मंगळवारी रात्री लागलेल्या आगीत सख्ख्या भावांची दोन घर जळून भस्मसात झाले. या आगीने सिलिंडरचा स्फोट झाल्याने रौद्ररुप धारण केले. घरातील सर्व साहित्य जळाले असून सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...
तलावांसाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यात तलावांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. असेच चित्र राहले तर भविष्यात पाण्यासाठी हाहाकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेले तलाव प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे शेवटच्या घटका मोजत आहेत. ...
जीवनदायीनी वैनगंगा नदीचा गत २० वर्षांपासून प्रवाह बदलत असून या बदलत्या प्रवाहाचा फटका तुमसर तालुक्यातील रेंगेपार येथील १५५ घरांना बसत आहे. वैनगंगा नदीने नदीतिरावरील अर्धा किमी परिसर गिळंकृत केला असून १५५ कुटुंबांचे पुनर्वसन शासनाने केले आहे. मात्र दो ...
तालुक्यातून वाहणाऱ्या नदी-नाल्यात पाण्याचा एकही थेंब नसून नदीनाल्यांचे पात्र वाळवंटासारखे भासत आहे. परिणामी गावागावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून पाण्याची तजवीज करताना तारेवरची कसरत करावी लागते. माणसासोबतच जनावरांचीही पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने नागरिक हैराण झाले आहे. त्याचप्रमाणे या वाढत्या उष्माचा त्रास पशू-पक्ष्यांनाही तितकाच होत आहे. उष्माघाताचा बळी ठरलेले चिमणी, कावळे, कबूतर, घार, कुत्री, मांजर अशा अनेक पशू-पक्ष्यांना सध्या सावलीच्या ...
लाखनी शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडवरील नाल्या घाण पाण्याने तुंबलेल्या आहेत. स्थानिक गांधी स्मारक समितीच्या परिसरात दुर्गंधी युक्त घाण पाणी साचले आहे. परिणामी जाणाऱ्या येणाºया लोकांना व परिसरातील व्यावसायीकांना त्रास सहन करावा ...
येथील इंडियन मेडिकल असोसिएशनचे आधारस्तंभ, विविध सामाजिक चळवळीचे प्रणेते आणि भंडाराभूषण डॉ. एल.डी. उपाख्य लोकनाथ गिऱ्हेपुंजे यांचे वृद्धापकाळाने रविवारी सायंकाळी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. ...
स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून कार्डधारकांना पुरविण्यात येणाऱ्या तुळ डाळीच्या किमतीत गत महिन्यापासून आणखी भर घालत भाववाढ करण्यात आली असल्याने आताही तुरडाळ ५५ रूपये प्रती किलो दराने विकली जात आहे. दुष्काळसदृश परिस्थितीत डाळीचे दर वाढविल्याने राशन ...
सध्या लग्नसराई सुरू असून जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी लॉन्स आणि मंगल कार्यालये हाऊसफुल्ल असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. प्रतिष्ठा जपण्याच्या हव्यासापायी होऊ द्या खर्च, अशी मानसिकता ग्रामीण भागात होऊ लागली आहे. मोकळ्या वावरात किंवा घराच्या समोर भलामोठा ...
वैशाखचा वाढता उकाडा असह्य होत असून ग्राहकांकडून पाणीदार फळांची मागणी वाढली आहे. उकाड्यामुळे घशाला कोरड पडत असल्याने टरबूज,डांगर,काकडी यांसारख्या फळांची मागणी ग्राहकांकडून होत असल्याने बाजारात टरबूजाचे दर वाढले आहेत. ४० ते ५० रुपयात मिळणारे टरबूज आता ...