धान उत्पादक धडकले जिल्हा मार्केटिंग कार्यालयावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 22:54 IST2019-07-03T22:53:56+5:302019-07-03T22:54:10+5:30
'सबका साथ सबका विकास' अशी घोषणा असताना शासनाचीे पुन्हा शेतकऱ्यांविषयी उदासीनता दिसून येत आहेत. धान हमी केंद्रावर धान विकून ४५ दिवसांचा कालावधी लोटला असताना देखील आता खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना चुकारे न मिळाल्याने शेतकरी खरीपाच्या तोंडावर संकटात सापडला आहे.

धान उत्पादक धडकले जिल्हा मार्केटिंग कार्यालयावर
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : 'सबका साथ सबका विकास' अशी घोषणा असताना शासनाचीे पुन्हा शेतकऱ्यांविषयी उदासीनता दिसून येत आहेत. धान हमी केंद्रावर धान विकून ४५ दिवसांचा कालावधी लोटला असताना देखील आता खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना चुकारे न मिळाल्याने शेतकरी खरीपाच्या तोंडावर संकटात सापडला आहे.
पालांदूर परिसरात पावसाने सुरूवात केली असल्याने सर्वत्र शेतपरिसरात रोवणीला प्रारंभ झाला आहे. मात्र खिशात पैसे नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे विलंबाने का होईना खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना थकीत चुकारे मिळतील, अशी आशा होती. परंतु ती फोल ठरली आहे. दिवसभर पावसाची संततधार सुरू असताना देखील पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हा मार्केटिंगच्या कार्यालयावर शेतकऱ्यांनी धडक देवून अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
१५ मे पासून जेवनाळा येथे हमी केंद्रावर धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. संपूर्ण जून महिना उलटला तरी देखील शेतकºयांच्या हातावर रक्कम जमा न झाल्याने शेतकऱ्यांना पावलोपावली समस्या भेडसावत आहेत. बी-बियाणे, खते व शेतीकामासाठी शेतकऱ्यांना पैशाची नितांत गरज असताना देखील शासनाकडून धानांच्या चुकाऱ्यांसाठी दुर्लक्ष होत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी परिसरातील लोकप्रतिनिधींना भेटून आपले गाऱ्हाणे मांडले आहे.
भंडारा जिल्हा धानाचे कोठार म्हणून परिचित असताना धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्याकडे शासनाचे डोळेझाक होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून थकीत धान चुकाऱ्यासाठी निवेदन देणार असल्याचे सांगितले. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.