किडींमुळे धानपिकाची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 21:44 IST2017-11-05T21:44:17+5:302017-11-05T21:44:27+5:30

पूर्वी पावसाने शेतीचे हाल केले असतानाच आहे त्या पिकांवर किड व रोगांनी डल्ला मारल्याने पिकांची नासाडी झाली आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाला असून शासनाकडे मदतीची मागणी करीत आहे.

 Paddy Harvest Work | किडींमुळे धानपिकाची नासाडी

किडींमुळे धानपिकाची नासाडी

ठळक मुद्देशेतकºयांचे नुकसान : शासनाकडे मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडमोहाडी : पूर्वी पावसाने शेतीचे हाल केले असतानाच आहे त्या पिकांवर किड व रोगांनी डल्ला मारल्याने पिकांची नासाडी झाली आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाला असून शासनाकडे मदतीची मागणी करीत आहे.
तिरोडा तालुक्यातील बोदा या गावातील शेतकरी रमेश लक्ष्मण रिनाईत (४५) व अनेक शेतकºयांच्या शेतात मावा, तुडतुडा या किडीने धानपिक ग्रस्त झाले आहे.
रिनाईत यांनी एकूण ४ एकरमध्ये जय श्रीराम धानाची लागवड केली आहे. यासाठी लागवड व एकूण ६० रूपयांचा खर्च झालेला आहे. मात्र किडीने उत्पादन शून्य झाले आहे. त्यांनी पीक विमा काढला आहे.
मात्र याकडे तालुक्यातील अधिकारी दुर्लक्ष करीत असून आतापर्यंत काहीच चौकशी कोणत्याच अधिकाºयांनी केलेली नाही.
त्यामुळे आता शेतकºयांनी बँकेचे व सावकारी कर्ज कसे परत करावे हा मोठा प्रश्न शेतकºयांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे आता या शेतकºयांसमोर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरलेला नाही.
शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश स्थानिक अधिकाºयांना द्यावे व पिकांची नुकसान भरपाई व कर्जमाफी देऊन तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.

Web Title:  Paddy Harvest Work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.