सिंचन सुविधाअभावी धान उत्पादक व्यथित
By Admin | Updated: December 6, 2015 00:39 IST2015-12-06T00:39:02+5:302015-12-06T00:39:02+5:30
साकोली विधानसभा मतदार संघ अस्तित्वात येऊन सहा वर्षे झाली. सन २००९ मध्ये या मतदार संघात लाखांदूर तालुक्याचा समावेश झाला.

सिंचन सुविधाअभावी धान उत्पादक व्यथित
साकोली मतदारसंघ : रस्ते व पाण्याची समस्या कायम
संजय साठवणे साकोली
साकोली विधानसभा मतदार संघ अस्तित्वात येऊन सहा वर्षे झाली. सन २००९ मध्ये या मतदार संघात लाखांदूर तालुक्याचा समावेश झाला. त्यामुळे मतदार संघ विस्तारला आणि नानाविध समस्याही वाढल्या आहेत. सिंचन प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. मात्र ते पुर्णत्वास गेले नाही. परिणामी हजारो एकर शेती सिंचनापासून वंचित आहे. उच्च शिक्षणाच्या सोयी नाही. बेरोजगारी वाढली आहे. या मतदारसंघात उद्योगधंदे नाही. या मतदारसंघातून चुलबंद नदी, राष्ट्रीय महामार्ग असूनही हा मतदारसंघ कायम उपेक्षित आहे.
निम्न चुलबंद, भिमलकसा व भुरेजंगी प्रकल्पाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या प्रकल्पातून सिंचनासाठी लवकरच पाणी मिळणार आहे. माजी मालगुजारी तलावाच्या दुरूस्तीची प्रक्रिया सुरू आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी कटीबद्ध आहे.
-बाळा काशीवार, आमदार, साकोली.
शेतकऱ्यांचे धान्य साठविण्यासाठी गोदाम, धान्याचे आधारभूत किमती व तालुक्यातील सिंचन प्रकल्पाचे काम पूर्ण करून सिंचनाची सोय करावी व शेतीसाठी २४ तास विद्युत पुरवठा उपलब्ध करून द्यावा.
- मदन रामटेके, माजी सभापती, साकोली.
औद्योगिक विकासासाठी एमआयडीसी सुरू व्हावी. तर युवकांना रोजगार उपलब्ध करून क्षेत्राचा विकास होईल व रखडलेले प्रकल्प पूर्ण करून क्षेत्रात हरितक्रांती घडवून आणावी.
- प्राचार्य होमराज कापगते, जि.प. सदस्य, कुंभली.
साकोली मतदारसंघात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. शिक्षण रस्ते, वीज पुरवठा यासारख्या समस्या आहेत. या समस्याही मार्गी लावण्याची गरज आहे.
- नंदकिशोर समरीत, तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी.
साकोली ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, महिला वैद्यकीय अधिकारी नियुक्त करावे. रक्तपेढी असावी. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा परिपूर्ण भरून सामान्य लोकांना रुग्णसोयी पुरविण्यात यावे.
- किशोर पोगळे, माजी उपसरपंच, ग्रा.पं. साकोली.